HW News Marathi
देश / विदेश

डोनाल्ड ट्रम्प देशात आणीबाणी लागू करण्याच्या विचारात ?

नवी दिल्ली | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशात आणीबाणी लागू करण्याचा निर्णय पक्का केल्याचे वृत्त अमेरिकेतील वृत्तपत्रांनी प्रकाशित केले आहे. मेक्सिकोमधून अमेरिकेत होणारी घुसखोरी रोखण्यासाठी देशाच्या सीमेवर भिंत उभारण्याच्या ट्रम्प सरकारच्या निर्णयाला संसदेकडून मंजूरी मिळणे कठीण झाल्यानेच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आणीबाणी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

मेक्‍सिकोतून अमेरिकेत होणारी घुसखोरी रोखण्यासाठी सीमेवर भिंत उभारण्याचा प्रस्ताव ट्रम्प सरकारने संसदेसमोर मांडला होता. परंतु अमेरिकेतील विरोधी पक्षाच्या सदस्यांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध केला. दरम्यान, अमेरिकेच्या सीमेवर जर ही भिंत उभारायची असेल तर अमेरिकेच्या संसदेकडून परवानगी मिळणे आवश्यकच आहे. त्याचप्रमाणे जर आणीबाणी लागू केली तर ट्रम्प यांना संसदेची परवानगी न घेताही यासाठी पैसा मिळवणे सोपे होईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जाणून घ्या… भारतात कोणकोणत्या राज्यात किती ‘कोरोना’बाधित ?

swarit

आता तुम्ही ड्रोन उडवू शकता… पण या आहेत अटी

News Desk

सर्जिकल स्ट्राइकचा मोठ्या प्रमाणावर गवगवा करण्यात आला !

News Desk