टोकयो | टोकयो ऑलिम्पिक स्पर्धेत तिरंदाजीमध्ये मेडल मिळवण्याच्या भारताच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. भारताची अव्वल तिरंदाज दीपिका कुमारी (Deepika Kumari) क्वार्टर फायनलमध्ये पराभूत झाली आहे. दीपिकाचा दक्षिण कोरियाची नेमबाज अन सनने (An San) दीपिकाचा 30-27, 26-24, 26-24 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. दक्षिण कोरियाच्या अन सननं टोकोयो ऑलिम्पिकमध्ये 2 गोल्ड मेडल यापूर्वीच जिंकले आहेत.महिलांच्या सांघिक स्पर्धेत आणि मिक्स टीम इव्हेंटमध्ये तिने गोल्ड मेडल जिंकले आहेत. त्याचबरोबर एक नवा ऑलिम्पिक रेकॉर्ड देखील नोंदवला आहे. त्यामुळे दीपिकाला क्वार्टर फायनलमध्ये मोठे आव्हान होते.
#TokyoOlympics | Archery, Women's quarter-final: Deepika Kumari loses to South Korea's An San 0-6
(File pic) pic.twitter.com/yAuCCGNXAG
— ANI (@ANI) July 30, 2021
आन सननं पहिल्या सेटमध्ये जोरदार कामगिरी करत परफेक्ट 30 पॉईंटची कमाई केली.दीपिकानं 7,10,10 असे 27 पॉईंट्स मिळवले. पहिला सेट गमावल्यानंतर पुढील दोन सेटमध्ये दीपिकानं आणखी निराशा केली. पुढील दोन्ही सेट दीपिकानं 24-26, 24-26 या फरकानं गमावले.दीपिकाच्या पराभवानंतर भारताच्या आता सर्व आशा अतनू दासवर शिल्लक आहेत.
दीपिकानं रचला इतिहास
दीपिका कुमारीचं आव्हान संपुष्टात आले असले तरी ऑलिम्पिक स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये खेळणारी ती पहिली महिला ठरली. रशिया ऑलिम्पिक समितीची माजी वर्ल्ड चॅम्पियन सेनिया पेरोवाला ‘शूट ऑफ’मध्ये पराभूत केलं. पाच सेटनंतरही हा सामना बरोबरीत सुटल्यानं निकाल शूट ऑफमध्ये लागला. शूट ऑफमध्ये सेनियानं सात पॉईंट्स घेतले. तर दीपिकानं परफेक्ट 10 पॉईंट्सची कमाई करत क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला होता.
लवलिना जिंकली, भारताचं आणखी एक पदक निश्चित
महिला बॉक्सिंगमध्ये भारतीय बॉक्सर लवलिनानं जबरदस्त कामगिरी करत क्वार्टर फायनल जिंकली आहे. या विजयासह लवलीनानं इतिहास रचला असून भारताचं आणखी एक पदक निश्चित झालं आहे. क्वार्टर फायनलमध्ये भारताच्या लवलीनानं चिनी तायपेच्या निएन चिन चेनला पराभूत करत पदकावर शिक्कामोर्तब केलं आहे. 69 किलोग्राम गटात लवलिनानं भारताला आणखी एका पदक मिळवून दिलं आहे. चिनी तायपेच्या निएन चिन चेन हिला पराभूत करत लवलीनानं मेडल निश्चित केलं आहे. लवलीनानं आता सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. सेमीफायनलमध्ये ती पराभूत जरी झाली तरी तिला कांस्य पदक तरी मिळणार आहे. 69 किलोग्राम गटात लवलीना भारताकडून मेडल जिंकणारी पहिली महिला खेळाडू आहे. लवलीनाकडे भारताला सुवर्णपदक जिंकून देण्याची संधी आहे. मात्र यासाठी लवलीनाला आणखी दोन सामने जिंकावे लागणार आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.