न्यूयॉर्क | संयुक्त राष्ट्र महासभेत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दहशतवाद्याच्या मुद्यावरून खडसावल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला. यानंतर चिडलेल्या पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांना काय बोलावे हे बहुदा सुचत नसावे. म्हणून त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांची भेट झाली असती तर दोन्ही देशामध्ये गेल्या ७० वर्षांपासून काश्मीरचा मुद्दा प्रलंबित आहे. आणि दहशतवादी यासारख्या मुद्द्यांवर चर्चा करता आली असती, असे म्हटले. परंतु भारताने तिसऱ्यांदा पाकिस्तानसोबतची भेट नकारली आहे. त्यामुळे भारताला शांततेसाठी बातचीत करण्याऐवजी अंतर्गत राजकारणाला प्राधान्य देत असल्याचे कुरैशी यांनी महासभेत म्हटले आहे.
The meeting between India & Pakistan could have been a good opportunity to have a dialogue on various issues. But due to their attitude, Indian govt lost this opportunity for the third time. They gave priority to politics over peace: Pakistan Foreign Minister at the #UNGA pic.twitter.com/0nwzH4iMGZ
— ANI (@ANI) September 29, 2018
‘भारताने आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. भारताने हल्ला करण्याची चूक केली तर भारताला याचे परिणाम भोगावे लागतील. आम्ही पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाशी तडजोड करणार नाही”, यावेळी कुरैशी म्हणत, त्यावरून पुन्हा एकदा पाकिस्तानचा खरा चेहरा सर्व जागासमोर आला.
महासभेत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला दहशतवादच्या मुद्द्यावरून खरपूस समाचार घेतला. ‘पाकिस्तान हा असा शेजारी देश आहे, की ज्याने दहशतवाद पसरवण्याबरोबरच ते सत्य कशा प्रकारे नाकारण्याचे चांगले कसब त्यांना अवगत आहे.’ तसेच ‘पाकिस्तानमध्ये २६/११च्या हल्ल्याचा मास्टर माईंड उजळ माध्याने फिरत आहे’. अशा शब्दात स्वराज यांनी पाकिस्तानवर तोफ डागली.
#WATCH: EAM Sushma Swaraj in her address at #UNGA reacts on meeting between her and Pakistan foreign minister on the sidelines of UNGA called off by India pic.twitter.com/lobY7BKLWj
— ANI (@ANI) September 29, 2018
पाकिस्तानच्या खुराफातीमुळे शांततेसाठीची चर्चा नेमीच रद्द करण्यात आली आहे. पाकचे नवे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतासमोर चर्चेसाठी प्रस्ताव ठेवला होता. यासाठी भारतही तयार होता, परंतु पाकिस्तानने भारताच्या तीन जवानांचे अपहरण करून त्यापैकी एकाची हत्या केली. त्यामुळे भारताने पाकिस्तानसोबत चर्चेला नकार दिल्याचे सुषमा स्वराज यांनी महासभेत सांगितले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.