नवी दिल्ली | २१ दिवसांच्या लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना केवळ जीवनावश्यक गोष्टी घेण्यासाठीच बाहेर पडता येणार आहे. आणि याच जीवनावश्यक गोष्टींचा साठा देशाकडे पुरेपुर असल्याची माहिती पीयुष गोयल यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. भारतीय खाद्य महामंडळाकडे ६ महिने पुरेल इतका खाद्यपदार्थांचा साठा आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात लोकांना घाबरुन जाण्याचे कारण नाही आहे.
अन्नदाताः COVID-19 के दौरान @FCI_India रेलवे 🚆 के माध्यम से खाद्यान्न आपूर्ति को सुनिश्चित कर रहा है।
रेलवे के 352 रैक से 9.86 लाख मीट्रिक टन खाद्यान्न देश के विभिन्न हिस्सों में भेजा गया है। सरकार के इस कदम से किसानों को भी उनकी आय में सहायता मिलेगी।https://t.co/Kumr9kkY0m pic.twitter.com/rhKN9MLtmJ
— Piyush Goyal (@PiyushGoyal) April 2, 2020
अन्न मंत्रालयानुसार भारतीय खाद्य महामंडळ (एफसीआय) ही देशातील धान्य साठवण्याची सर्वात महत्वाची सरकारी संस्था असून, ३१ मार्चला एफसीआयकडे ५.६७ कोटी मेट्रिक टन धान्यसाठा होता. यामध्ये ३ कोटी मेट्रिक टन तांदुळ तर २.६० कोटी मेट्रिक टन गहू आहे. एफसीआयने मोफत अन्न पुरवठा करण्याचीही तयारी केली आहे. दरम्यान, अन्नमंत्री रामविलास पासवान यांनीही ट्विट करत अन्नसाठा पुरेसा असल्याची माहिती दिली होती.
कोरोना #COVID19 के खिलाफ जारी लॉकडाउन में भारतीय रेलवे ने अबतक रिकॉर्ड 352 रेक द्वारा @FCI_India के 10 लाख टन खाद्यान्न की आपूर्ति देशभर में की है। इसके लिए @RailMinIndia , इसके प्रतिबद्ध कर्मचारियों और मज़दूरों को धन्यवाद। @narendramodi @PiyushGoyal #IndiaFightsCorona pic.twitter.com/XdCs2xlQep
— Ram Vilas Paswan (@irvpaswan) April 2, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.