HW News Marathi
देश / विदेश

नासाच्या ‘इनसाईट’ यानची मंगळावर यशस्वी लँडिंग

नवी दिल्ली | अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेचे (नासा) ‘इनसाईट मार्स लँडर’ यान मंगळ ग्रहावर यशस्वीरित्या उतरले आहे. नासाने सोमवार (२६ नोव्हेंबर) आणि मंगळवार (२७ नोव्हेंबर)ला दरम्यान भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री १ वाजून २४ मिनिटांनी इनसाईट यान मंगळ ग्रहावर लँडिंग झाले आहे. मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर यान उतरताना १९,८०० किमी प्रति तास वेगाने जाणारे हे यान सहा मिनिटांत शून्य वेगावर आले. यानंतर यान पॅराशूटमधून बाहेर आले आणि लँड झाले. नासाने इसाईट या यानाचे थेट प्रक्षेपणही करण्यात आले.

मंगळ ग्रहावरील रहस्य जाणून घेण्यासाठी हे यान तयार करण्यात आले आहे. इनसाईटने मंगळ ग्रहावरुन आपले पहिले छायाचित्रही पाठवले आहे. नासाच्या या प्रकल्पासाठी १ बिलियन डॉलर म्हणजेच ७० अब्ज रुपये खर्च आला आहे. सौर ऊर्जा आणि बॅटरीने ऊर्जा मिळवणाऱ्या लँडरला २६ महिन्यांपर्यंत संचलित केले जाऊ शकते. परंतु, नासाला यापेक्षा अधिक कालावधी ते सुरू राहू शकेल अशी अपेक्षा आहे. इनसाईट यान हे मंगळावरील मानव मिशनपूर्वी त्याच्या पृष्ठभागावर उतरणे आणि येणाऱ्या भूकंपाचे मापन करण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे. यानातील सिस्मोमीटरच्या मदतीने मंगळावरील अंतर्गत परिस्थितीचा अभ्यास केला जाईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रिया मलिककडून सुवर्णपदकाची कमाई,जागतिक कुस्ती स्पर्धेत यश पटकावलं

News Desk

भगव्या वेशभुषेमुळं माझ्याविषयी गैरसमज – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

News Desk

भारतरत्न जाहीर झाल्यानंतर प्रणव मुखर्जी यांनी केले ‘हे’ विधान

News Desk