HW News Marathi
देश / विदेश

इन्स्टाग्राम फीचर्स बदलणार

मुंबई | कमी काळात सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या ऍप पैकी एक ऍप म्हणजे इन्स्टाग्राम होय आणि हेच इन्स्टाग्राम आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत असतं. येत्या काही दिवसात इन्स्टाग्राममध्ये युजर्सना अनेक नवीन बदल पाहायला मिळणार आहेत. इन्स्टाग्राममध्ये प्रोफाइल, फीचर, आयकॉन्स आणि बटण अधिक आकर्षक करण्यात येणार आहे. या संदर्भात चाचणी सुरू असल्याची माहिती देण्यात आली असून या नव्या फिचर्सच्या मदतीने युजर्स आपल्या मित्रमैत्रिणींसोबत चांगल्या पद्धतीने कनेक्ट होणार आहेत.

यावेळी युजर्सच्या प्रोफाईल कंटेंटमध्ये कोणातही बदल होणार नाहीत. असे कंपनीने सांगितलं आहे. मात्र नवीन फीचर अॅड झाल्यानंतर फॉलो आणि मेसेजचं बटण बाजूबाजूला येणार आहे. तसेच आपण जेव्हा कोणाच्याही प्रोफाइलवर टॅप करू तेव्हा आपल्याला म्यूच्युअल फॉलोअर्स दिसणार आहेत. युजर्संना इन्स्टाग्रामचा वापर करणं अधिक सोयीचे व्हावे यासाठी प्रयत्न करत असल्याचं कंपनीने म्हटले आहे. इन्स्टाग्राम रीडिझाईनमध्ये काही खास बदल करण्यात येणार आहेत. यामध्ये फॉलोअर्स काऊंट आधीच्या तुलनेत वेगळ्या पद्धतीने दिसणार आहेत. गेल्या आठवड्यात इन्स्टाग्रामने युजर्स अॅपवर किती वेळ घालवतात हे सांगणार नवं फीचर आणलं होतं. तसेच कंपनीने फेक फॉलोअर्स आणि स्पॅमर्सला रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. इन्स्टाग्रामसोबतच ट्वीटरनेही काही दिवसांपूर्वी आपल्या iOS अॅपमध्ये अशाच प्रकारचे काही बदल केले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एकीकडे राज्यात कोरोनाची भीती आणि दुसरीकडे मास्क आणि सॅनिटायझर्सचा तुटवडा

swarit

ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांनी घेतला अखेरचा श्वास

News Desk

1 एप्रिल म्हणजे मोदींचा वाढदिवस; राष्ट्रवादीकडून अनोखा वाढदिवस साजरा!

News Desk