HW News Marathi
राजकारण

धमकी आली हा म्हाडाच्या अध्यक्षांचा डाव !

मुंबई | “म्हाडामध्ये अधिकाऱ्यांना जास्त अधिकार असतात. तेच अधिकार मर्यादित अधिकार असलेल्या म्हाडाच्या अध्यक्षांना हवे आहेत. म्हणून त्यांनी हा डाव खेळला आहे”, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. शिवसेनेचे आमदार आणि म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत यांना बिल्डरांकडून धमक्या येत असल्याचा प्रश्न मिडियाच्या प्रतिनिधींनी विचारला असता नवाब मलिक यांनी शिवसेना आमदार उदय सामंत यांचा चांगलाच समाचार घेतला.

“म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांच्या जीवाला धोका आहे आणि त्यांना बिल्डर मारण्याच्या धमक्या देत असल्याचा ते दावा करत आहेत. त्यामुळे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. म्हणजेच म्हाडाचे अधिकारी त्यांचे ऐकत नाहीत का ? त्यांना वेगळया पध्दतीने कारभार करायचा आहे का ?”, असा सवाल नवाब मलिक यांनी केला आहे. “जी नेमलेली समिती आहे त्याची बैठक घेवून त्यामध्ये घेतलेल्या निर्णयाला मंजुरी देण्याची फक्त जबाबदारी त्यांची आहे”, असेही नवाब मलिक म्हणाले.

म्हाडाच्या अध्यक्षांना कार्यकारी अधिकार नसतो. परंतु यामध्येच अधिकारी व अध्यक्षांमध्ये वाद सुरु आहे. त्यामध्ये काहीतरी वेगळी ठिणगी टाकून अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा अध्यक्षांचा डाव असून याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी नवाब मलिक यांनी केली. समितीची बैठक लावणे आणि अध्यक्षांसमोर आलेल्या प्रस्तावांना मजुरी देणे इतकाच मर्यादित अधिकार अध्यक्षांना असतो. कार्यकारी अधिकारी यांना सगळे अधिकार असतात तेच अधिकार म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत यांना हवे आहेत असाही आरोप नवाब मलिक यांनी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधानसभेचे दोन दिवसीय अधिवेशन; विधानसभा अध्यक्षाच्या पदासाठी आज होणार निवडणूक

Aprna

‘कबरची खबर’ शेवटी ‘राज’ उलघडलेच…! राज ठाकरें यांचा भाजपाध्यक्ष अमित शहांवर निशाणा

Adil

6 जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरून अजित पवारांच्या टोल्याला देवेंद्र फडणवीसांनी दिला गुरुमंत्री

Aprna