HW News Marathi
देश / विदेश

IPL २०२१चं वेळापत्रक झालं जाहीर..! ‘या’ दिवशी होणार अंतिम सामना

मुंबई | कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आलेले आयपीएल २०२१चे १४वे सत्र आता यूईमध्ये पूर्ण होईल. बायो बबलमध्ये कोरोनाच्या प्रवेशानंतर २९ सामन्यांनंतर लीग पुढे ढकलण्यात आली होती. बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेत उर्वरित ३१ सामने यूएईमध्ये खेळण्याची घोषणा करण्यात आली. आता या लीगच्या आयोजनाची तारीखही समोर आली आहे. १९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर अशा कालावधीत आयपीएल २०२१चा उर्वरित टप्पा खेळवण्यात येणार आहे. लीगचा अंतिम सामना १५ तारखेला म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी होणार आहे. आयपीएल २०२० प्रमाणे आयपीएल २०२१चे उर्वरित सामने दुबई, अबुधाबी आणि शारजाह या तीन शहरांमध्ये होणार आहेत. यासंदर्भात दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळांनी त्यांची संमती दर्शविली आहे.

बीसीसीआय आयपीएल २०२१चे उर्वरित राहिलेले सामने २५ दिवसांत घेणार आहे. डबल हेडर सामने कमी करण्यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात यूएईमध्ये उष्णता जास्त असल्याने खेळाडूंना उष्णतेचा सामना करावा लागेल. बीसीसीआयने हा टप्पा २५ दिवसात संपवला, तर ८ डबल हेडर सामने कमी होतील. दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्सला (केकेआर) मोठा झटका बसला आहे. संघाचा स्टार खेळाडू आणि वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने आयपीएलच्या उर्वरित हंगामात न खेळण्याचे म्हटले आहे. सध्याच्या काळात कोलकाता संघाला चांगली कामगिरी करता आली नसल्यामुळे हा संघाला दुहेरी धक्का मानला जाऊ शकतो. संघाने यंदा ७ पैकी केवळ २ सामने जिंकले आहेत. कोलकाता पॉइंट टेबलमध्ये सातव्या क्रमांकावर आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारतीय लष्कराकडून तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

News Desk

मुंबईत एकट्या ‘जी दक्षिण’ वॉर्डमध्ये ५३४ कोरोनाबाधित, ‘ही’ आहे वॉर्डनिहाय आकडेवारी

News Desk

‘कोमामधून ते अजून बाहेर आलेले नाहीत’, मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका

News Desk