HW News Marathi
देश / विदेश

भूकंपाच्या तीव्र धक्क्याने इराण-इराक हादरले, दीडशे जणांचा मृत्यू

बगदादः इराण-इराक सीमेवर भूकंपाच्या तीव्र धक्क्याने दीडशेहून अधिक लोकांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. ७.३ रिश्टर स्केलचा हा भूकंप असल्याने मोठी हानी झाली. रविवारी रात्री ९.१८ च्या सुमारास भूकंपाचा धक्का जाणवला. भूकंपाचा केंद्रबिंदू इराकमधील हलब्जापासून ३२ किमी अंतरावर असल्याचे अमेरिकेच्या भूगर्भतज्ज्ञांनी सांगितले. भूकंपामुळे इराणमधील अनेक ठिकाणी वीज गेल्यामुळे मदतकार्यात मोठी अडचण येत होती. देशातील १४ राज्यांना भूकंपाचा धक्का जाणवला. या सर्व राज्यांमध्ये सोमवारी शाळा, महाविद्यालये बंद राहणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. इराणला यापूर्वी २००३ मध्ये भूकंपाचा तीव्र धक्का बसला होता. यामध्ये सुमारे २६ हजार लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. भूकंपामुळे वित्तहानीची माहिती समजू शकलेली नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रगीताचा अनादर केल्याप्रकरणी ममता बॅनर्जी यांना मुंबई न्यायालयाचे समन्स

News Desk

भारत- चीनचे सैन्य भिडले

News Desk

छत्रपतींची तुलना मोदीचं काय,कोणाशीचं होऊ शकत नाही..

Arati More