HW News Marathi
देश / विदेश

‘मंगळयाना’नंतर आता इस्रोची ‘शुक्रा’वर जाण्याची तयारी

नवी दिल्ली | ‘मंगळयाना’नंतर भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) आता शुक्रावर अंतराळयान पाठविण्याची नवी मोहीम हाती घेतली आहे. तयारी सुरू केली आहे. भारताचे हे अंतराळयान २०२३ साली शुक्र ग्रहावर उतरणार असल्याची माहिती इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी दिली आहे. या मोहिमेत २० हूनही अधिक अंतराळ उपकरणांचा समावेश असणार आहे. इस्रोने येत्या १० वर्षांसाठी अनेक महत्त्वाकांक्षी मोहिमा हाती घेतल्या आहेत. शुक्रावर जाण्याची ही मोहीम देखील त्यांपैकीच एक आहे.

शुक्राच्या भूपृष्ठाची आणि कक्षेची माहिती मिळवण्याचा हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. शुक्र आणि पृथ्वी या दोन्ही ग्रहांमध्ये बरेच साम्य आहे. या दोन्ही ग्रहांचा आकार, निर्माणाची स्थिती, घनता, गुरुत्वाकर्षण यामध्ये मोठ्या प्रमाणात साम्य आहे. इस्रोच्या या मोहिमेत शुक्राच्या थरांचा, वातावरणाचा आणि सूर्याशी असलेल्या संबंधांचा अभ्यास केला जाणार आहे. भारताच्या या मोहिमेबद्दल जगभरातील अनेक देशांना उत्सुकता असून २० देशांनी या मोहिमेत सहभागी होण्याची इच्छा देखील व्यक्त केल्याची माहिती के. सिवान यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

श्रीनगरमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

swarit

राहुल गांधींनी शिवजयंतीनिमित्त मराठीतून शुभेच्छा

News Desk

भारतीय उद्योगांच्या विकासात भरीव योगदान देणारा देशाभिमानी उद्योजक गमावला! – मुख्यमंत्री

Aprna