बंगळुरू | देशाच्या अंतराळ क्षेत्राच्या इतिहासात आज महत्त्वाची घटना घडणार आहे. ‘चांद्रयान-२’ चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणार आहे. चांद्रयान – २ने आज (२० ऑगस्ट) ९ वाजून २ मिनिटांनी चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. तब्बल ३० दिवसांच्या प्रवासानंतर भारताचे चंद्रयान २ आपल्या लक्ष्याच्या जवळ पोहोचले असल्याची माहिती इस्रोने ट्वीट करत दिली आहे. भारताच्या यशानंतर इस्त्रो आज सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. यात चांद्रयान – २च्या यशाबद्दल सखोल माहिती दिली जाणार आहे.
Today (August 20, 2019) after the Lunar Orbit Insertion (LOI), #Chandrayaan2 is now in Lunar orbit. Lander Vikram will soft land on Moon on September 7, 2019 pic.twitter.com/6mS84pP6RD
— ISRO (@isro) August 20, 2019
अखेरीस हे यान चंद्राच्या ध्रुवावरून जात चंद्रावरील १०० किमी अंतरावरील आपल्या शेवटच्या कक्षेत पोहोचेल. 2 सप्टेंबर रोजी लँडर विक्रम ऑर्बिटरपासून वेगळे होईल. त्यानंतर 7 सप्टेंबर रोजी विक्रम चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील पृष्टभागावर लँडर विक्रम उतरेल, इस्त्रोने ट्वीट करत ही माहिती दिली आहे. ७ सप्टेंबरला चंद्रायान – २ची लँडिंग पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्त्रोमध्ये येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
Dr. K. Sivan, Chairman, ISRO will brief media today (August 20, 2019) at 1100 hrs IST on the occasion of Lunar Orbit Insertion of #Chandrayaan2
Stay tuned on our website and youtube channel to watch live
— ISRO (@isro) August 20, 2019
‘चंद्रयान-2’ चे श्रीहरीकोटा येथून २२ जुलैला दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी ‘चंद्रयान-२’ चे यशस्वी प्रक्षेपण झाले. त्यानंतर १६ मिनिटांनी चंद्रयान-२ बाहुबली रॉकेटपासून वेगळे होऊन पृथ्वीच्या कक्षेत फिरण्यास सुरुवात झाली. यानंतर १४ ऑगस्टला चंद्रयान पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडले. यामुळे आतापर्यंत चंद्रयान २ चा सर्व प्रक्रिया सामान्यपणे पार पडत आहेत. हे मोहिम यशस्वी झाल्यास चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यानिमित्ताने प्रकाश पडणार आहे. असे इस्त्रोने स्पष्ट केले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.