HW News Marathi
देश / विदेश

महाराष्ट्रातील जत तालुक्यातील दुष्काळी भागात कर्नाटकाने पाणी सोडून डिवचले

मुंबई | सांगली (Sangli) जिल्ह्यातील जत तालुक्यातील गावात दुष्काळी स्थिती आहे. या दुष्काळग्रस्त गावांना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (CM Basavaraj Bommai) यांनी तुबची बबलेश्वर योजनेतून जत तालुक्यातील दुष्काळी तिकोंडी तलावात पाणी सोडले. यामुळे कर्नाटक सरकारने पुन्हा एकदा महाराष्ट्राला डिवचले आहे.

 

यापूर्वी जत तालुक्यातील 65 गावांत विस्तारित म्हैसाळ योजनेचा अहवाल तात्काळ जाहीर करण्याच्या सुचना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगली जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केली होती. या पार्श्वभूमीवर दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी आज (1 डिसेंबर) सकाळी केली. यावेळी कर्नाटकाने सोडलेल्या पाण्याने तिकोंडी तलाव तुडूंब भरून वाहत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या दिर्शनास आले. दरम्यान, कर्नाटक सरकारने बुधवारी (30 नोव्हेंबर) पाणी सोडल्यानंतर आज दुपारी तलवा भरल्याचे माहिती मिळाली.

 

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जत तालुक्यावर केला दावा

गेल्या काही दिवसांपूर्वीच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगलीतील जत तालुक्यातील 40 गावांनी कर्नाटकात जाण्याचा ठराव संमत केला होता. यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री यासंदर्भात गांभीऱ्यांने विचार करत असल्याचे त्यांनी माध्यमांसमोबर सांगितले. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या दाव्यामुळे राज्यात एकच राजकीय भूकंप झाला होता. कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणाले, “या पार्श्वभूमीवर बसवराज बोम्मई म्हणाले, “सांगलीतील जत तालुका दुष्काळ आणि भीषण पाणीटंचाई असते. या गावांना पाणी देऊन आम्ही मदत केली आहे. या तालुक्यातील 40 गावांनी कर्नाटकात सामील होण्याचा ठराव केला आहे. या गावांनी केलेला ठरावाचा आम्ही गंभीरपणे विचार करत असून सीमा विकास प्राधिकरणाद्वारे आम्ही महाराष्ट्रातील कन्नड शाळांना अनुदान देणार आहोत.”

संबंधित बातम्या

सांगलीमधील जत तालुक्यातील 40 गावांचा कर्नाटकात समावेश?, बोम्मईंचे मोठे वक्तव्य

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अखेर कर्नाटकच्या राजकीय नाट्यावर पडदा, बी एस येडियुरप्पांचा राजीनामा

News Desk

भारतीय सैन्याचं शौर्याचं प्रतीक कारगिल युद्धाला आज 22 वर्ष पूर्ण

News Desk

कर्नाटक सरकारने सूचना स्वीकारली ! जयंत पाटलांची माहिती

News Desk