मुंबई | छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) जयंती साजरी करण्यावरून जेएनयूमध्ये (JNU) विद्यार्थी संघटना आणि अभाविपच्या विद्यार्थ्यांमध्ये वाद झाल्याची घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची एसएफआयच्या विद्यार्थ्यांनी तोडफोच केल्याचा आरोप अभाविपच्या विद्यार्थ्यांनी केली आहे. या घटनेनंतर विद्यार्थी संघटना आणि अभाविपच्या विद्यार्थीचे दोन्ही गट आमने-सामने आल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
या प्रकरणी अभाविपचे सचिव उमेशचंद्र अजमेरा एएनआयशी बोलताना म्हणाले, “शिव जयंतीनिमित्ताने आम्ही स्टुडंट अॅक्टिविटी सेंटरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा ठेवण्यात आली होती. परंतु, एसएफआयच्या विद्यार्थ्यांनी ही प्रतिमा बाहेर काढली. आणि त्यांनी हार कचरापेटीत फेकून दिला. एसएसआयच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठातील वातावरण दुषित करण्यात येत असून विद्यापीठ प्रशासनाने त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करावी,” आरोप त्यांनी केला.
ABVP members kept Shivaji's portrait at JNUSU office for which permission from JNUSU delegation was needed. Despite that, they did it illegally. Other students came there & removed all portraits for screening programme due to which fight broke out b/w two groups:JNU NSUI Gen Secy pic.twitter.com/TXdJYSlTMH
— ANI (@ANI) February 19, 2023
अभाविपने केलेल आरोप एनएसयुआयवर फेटाळलात म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा अभाविपकडून ज्या ठिकाणी ठेवण्यात आली होती. यासाठी विद्यापीठ प्रशासनाची परवानगी घेणे गरजेचे आहे. परंतु, अभाविपने कोणतीही परवानगी घेतली नाही. यापूर्वीच येथे काही कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यामुळेच विद्यार्थ्यांकडून शिवाजी महाराजांची प्रतिमा हटविण्यात आली.”
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.