HW News Marathi
देश / विदेश

डॉन छोटा राजन जे. डे. हत्याप्रकरणी दोषी

मुंबई | जेष्ठ पत्रकार जे. डे. हत्याप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. तर जिग्ना वोरा यांची निर्दोषमुक्ता करण्यात आली आहे. मुंबईतील विशेष मकोका कोर्टाने हा निर्णय दिला आहे. राजन पुरावे, साक्षीनुसार जे. डेंच्या हत्याप्रकरणाचा मुख्यसुत्रधार असल्याचे सिद्ध झाले आहे. छोटा राजन याला किती वर्षाची शिक्षा सुनावली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे.

छोटा राजन हा सध्या दिल्लीच्या तिहाड जेलमध्ये असून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात उपस्थित होता. जे. डे. हत्याप्रकरणी १३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात होता. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला, तर दुसरा आरोपी फरार आहे. उर्वरित ११ जणापैकी जोसेफ पॉलनस आणि जिग्ना वोरा या दोघांना निर्दोष मुक्तता करण्यात आली. तसेच सतीश काल्या, अभिजीत शिंदे, अरुण डाके, सचिन गायकवाड, अनिल वाघमोडे, निलेश शेंडगे, मंगेश अगनावे, विनोद असरानी आणि दीपक सिसोडीया हे नऊ जण दोषी सिद्ध झाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जम्मू-काश्मीरच्या सीमेवर महाराष्ट्रातील एक जवान शहीद

News Desk

127वं संविधान संशोधन विधेयक लोकसभेत मंजूर, आता जबाबदारी राज्यांवर!

News Desk

अपाचे लढाऊ हेलिकॉप्टर भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दाखल

News Desk