HW News Marathi
देश / विदेश

जैन मुनी शांतिसागर यांना बलात्कार प्रकरणी अटक

सुरत जैन मुनी शांतिसागर महाराज यांना शनिवारी रात्री बलात्कार प्रकरणी सुरत पोलिसांनी अटक केली आहे. 19 वर्षीय तरूणींने जैन मुनी शांतिसागरवर बलात्काराचा आरोप केला होता. तरूणीचे मेडिकल चेकअप केल्यानंतर बलात्कार झाल्याचे आढळले यानंतर जैन मुनी यांना शनिवारी अटक करण्यात आली.

तरूणीने सुरत पोलिस आयुक्त सतिश शर्मा यांना पत्र लिहून तिच्यावर जैन मुनी यांनी बलात्कार केल्याचा आरोप केला होता. पोलिस आयुक्तांनी खात्री करून जैन मुनीवर कारवाई केली.1 ऑक्टोंबरच्या रात्री सुरत शहरातील नानपुरा टिमलियावाड परिसरातील जैन मंदिरात तरूणीने आईवडीलांसोबत धर्मीक कार्यक्रमासाठी गेली होती. यावेळी आई वडील यांना मंत्र जप करण्यासाठी दुस-या रूममध्ये पाठवले त्यानंतर जैन मुनी यांनी माझ्यावर बलात्कार करताना ओरडले किवा विरोध केली तर तुझे आई वडील मरतील अशी धमकी दिल्याची तरूणीने तक्रारीत सांगितले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अब्दुल कुरेशी या दहशतवाद्याला दिल्लीत अटक

swarit

निर्मला सीतारमण यांनी बजेटमधील शेरो-शायरीची परंपरा कायम ठेवली

swarit

सज्जन कुमार अखेर शरण

News Desk