HW News Marathi
देश / विदेश

पुलवामामध्ये सुरक्षा दलाकडून ३ दहशतवादी ठार, १ जवान शहीद

श्रीनगर | सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. जम्मू-काश्मीरच्या पुलवामा परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये आज (१६ मे) पहाटेपासून चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले असून तर एक जवान शहीद झाला आहे. या परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने त्यांनी शोधमोहीम सुरू आहे. या शहीद जवानांचे नाव संदीप असे आहे.

सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये पुलवामामधील दलीपोरा येथे आज सकाळापासून चकमक सुरू झाली. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाताच त्यांनी शोध मोहीत हाती घेतली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. यावेळी तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. तर एक जवान शहीद झाला आहे. दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला असून त्यांच्या गोळीबाराला जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.

जम्मू काश्मीरच्या शोपियांमध्ये १२ मे रोजी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचे दोन दहशतवादी मारले गेले होते. खात्मा केलेल्या दहशतवाद्यांमध्ये माजी पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश होता. त्याआधी १० मे रोजी सुरक्षा यंत्रणांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डॉन छोटा राजन जे. डे. हत्याप्रकरणी दोषी

swarit

जाणून घ्या…भाजपच्या विधान परिषदेच्या ४ उमेदवारांबद्दल ही माहिती 

News Desk

सरन्यायाधीश दीपक मिश्रा सेवानिवृत्त, भारतीय न्यायव्यस्थेचे केले कौतुक

Gauri Tilekar