श्रीनगर । उत्तर काश्मीरच्या सोपोरमध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवादी यांच्या झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले असून एक जवान शहीद झाला आहे. लष्कर आणि दहशतवादी यांच्यात सध्या चकमक सुरू आहे. भारतीय लष्कराकडून काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात राबवण्यात येत असलेल्या मोहिमे अंतर्गत आज (२५ ऑक्टोबर)ला ६ दहशतवाद्यांना खात्मा करण्यात मोठे यश आले आहे.
Jammu and Kashmir: Two terrorists neutralised and one soldier killed in action in an ongoing encounter in Sopore. pic.twitter.com/dGGiJe9eAX
— ANI (@ANI) October 26, 2018
#LatestVisuals from north Kashmir's Sopore, where an encounter is underway between terrorists and security forces. (Visuals deferred by unspecified time). #JammuAndKashmir pic.twitter.com/s3eJhYPBT4
— ANI (@ANI) October 26, 2018
सहा दहशतवाद्यांचा खात्मा
काश्मीरमधील बारामुला आणि अनंतनाग येथे भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सहा दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. बारामुला येथे झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले. तर अनंतनाग येथे चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले.
भारतीय लष्कराकडून बारामुला जिल्ह्यात शोधमोहीम सुरू होती. त्यादरम्यान, दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. अनंतनाग जिल्ह्यात आज झालेल्या अन्य एका चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या दहशतवाद्यांबाबत माहिती गोळा करण्यात येत आहे. त्याआधी बुधवारी नौगाम येथील सुथू येथे झालेल्या चकमकीत दोन दहशवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.