HW Marathi
देश / विदेश

जम्मू-कश्मीरमच्या कुलगाममध्ये ५ दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर | जम्मू-कश्मीरममधील कुलगाममध्ये चकमकीत ५ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आले आहे. कुलगाम जिल्ह्यातील केल्लम देवसरा भागात सैन्याचे जवान आणि दहतवाद्यांमधे चकमकीत आज (१० फेब्रुवारी) सकाळी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. या ठिकाणी आणखी काही दहशतवादी लपल्याची शक्यता आहे. लष्कराच्या जवानाने परिसराला चारही बाजुनी वेढले असून जवान आणि दहशतवाद्यांमध्ये अद्याप चकमक सुरू आहे.

केल्लम देवसरा भागात दहशतवादी लपले असल्याची  माहिती सुरक्षादलाला मिळाली होती. यानंतर रविवारी पहाटे या परिसराला जवानांनी वेढा घालून सर्च ऑपरेशन सुरू केले. जवानांची चाहूल लागताच दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. परंतु सावध जवानांनी त्याला तत्काळ प्रत्युत्तर देत गोळीबार सुरू केला. पहाटेपासून सुरू असलेल्या चकमकीत आतापर्यंत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आले आहे. लष्काराच्या गोळीबारात ५ दहशतवादी ठार झाले असून आणखी एक ते दोन दहशतवादी लपल्याची शक्यता आहे.

 

Related posts

अमेरिकेने रद्द केली भारताची विशेष व्यापारी सूट

News Desk

आम्ही लक्ष्य पूर्ण करतो, किती दहशतवाद्यांचा खात्मा झाला हे मोजणे आमचे काम नाही !

News Desk

बळजबरीने चुंबन घेणाऱ्याची जीभ छाटली

News Desk