श्रीनगर | पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड कामरान आणि अब्दुल रशीद गाझीसह एका दहशतवाद्यांला कंठस्नान घालण्यात भारतीय लष्करला यश आले आहे. दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात पिंगलिना परिसरात रविवारी (१७ फेब्रुवारी) मध्यरात्रीपासून चकमक सुरू झाली होती. दशतवादी एका घरात लपून बसून जवानांवर गोळीबार करत होते. या गोळीबारीचे चोख प्रत्युत्तर देताना मेजरसह ४ जवान शहीद झाले असून १ स्थानिक नागिरकाचा मृत्यू झाला आहे.
#JammuAndKashmir : Two terrorists have been killed during encounter between terrorists and security forces, in Pinglan area of Pulwama district. Operation still in progress.
— ANI (@ANI) February 18, 2019
चकमकीत ठार केलेले दोन अतिरेकी हे ‘जैश-ए- मोहम्मद’ या अतिरेकी संघटनेचे कमांडर असल्याची माहिती मिळली आहे. लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले आहे. ज्या दहशतवाद्यांना लष्कराकडून ठाक करण्यात आले त्यांचे नाव कामरान आणि कमांडर अब्दुल रशीद गाझी असे आहे. भारतीय लष्कराने ज्या घरात दहशतवादी लपून बसून गोळीबार करत होते, त्या घराला जवानांनी उदध्वस्त केले आहे. या चकमकीत जैश-ए-मोहम्मदचा कमांडर आणि पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंडचा खात्मा करण्यात आले आहे.
Sources: A top Jaish-e-Mohammed commander linked to #PulwamaAttack believed to be trapped in the ongoing encounter with security forces in Pulwama; Deferred visual from the encounter site in Pulwama pic.twitter.com/AK4TjTvfKe
— ANI (@ANI) February 18, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.