HW News Marathi
देश / विदेश

प्रसिद्ध तेलुगू अभिनेता जयप्रकाश रेड्डी यांचे निधन

नवी दिल्ली । तेलुगू सिनेसृष्टीसह सर्वांसाठीच एक अत्यंत दुःखदायक बातमी आहे. प्रसिद्ध तेलुगू अभिनेता जयप्रकाश रेड्डी यांचे आज (८ सप्टेंबर) निधन झाले आहे. आंध्र प्रदेशातील गुंतूर येथे जयप्रकाश यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७४ वर्षांचे होते. हृदयविकाराच्या झटक्याने जयप्रकाश यांचे निधन झाले आहे.

प्रेमिंचू कुंदन रा, गब्बर सिंह, चेन्नाकेशव रेड्डी, टेम्पर हे जयप्रकाश यांचे काही प्रचंड गाजलेले सिनेमे आहेत. त्यांनी अभिनयाची सुरूवात ब्रह्मपुत्रडू या सिनेमातून केली होती. दरम्यान, त्यांच्या निधनाच्या बातमीनंतर सिनेसृष्टीत मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. तेलुगू देसम पक्षाचे अध्यक्ष एन चंद्राबाबू नायडू यांनी देखील जयप्रकाश रेड्डी यांच्या निधनानंतर ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

“जयप्रकाश रेड्डी यांच्या जाण्याने आज तेलुगू सिनेसृष्टी आणि नाट्यसृष्टीने एक हिरा गमावला आहे. त्यांच्या बहुआयामी कलाविष्काराने गेल्या काही दशकात आम्हा सर्वांना काही आठवणीतील सिनेमॅटिक क्षण दिले आहेत. मी त्यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या दु:खात सहभागी आहे”, असे ट्विट चंद्रबाबू नायडू यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Coronavirus | देशात येत्या रविवारी ‘जनता कर्फ्यू’, पंतप्रधानांची मोठी घोषणा

News Desk

राजीव गांधी सामूहिक हत्याकांडाचे जनक, भाजपचे दिल्लीच्या चौकात पोस्टर्स

swarit

कपडे बदलताय, जरा सावधान, छुप्या कॅमेरांची असते तुमच्यावर नजर

News Desk