नवी दिल्ली | पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्या प्रकरणी स्वयंघोषित गुरू आणि डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीमला विशेष सीबीआय न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राम रहीमने न्यायालयात हजर होता. अन्य तीन आरोपी कृष्ण लाल, कुलदीप आणि निर्मल सिंग यांनाही जन्मठेप ठोठावण्यात आली.
Journalist Ramchandra Chhatarpati murder case: Three other convicts Kuldeep Singh, Nirmal Singh and Krishan Lal, have also been awarded life imprisonment. The Court has also imposed a fine of Rs 50,000 each. https://t.co/rclAjUMaCs
— ANI (@ANI) January 17, 2019
हरियाणातील पंचकूला येथील सीबीआय विशेष न्यायालयाने पत्रकार छत्रपती हत्येप्रकरणी राम रहीमला (११ जानेवारी) दोषी दोषी ठरविण्यात आले होते. न्यायालयाकडून या पत्रकाराच्या हत्येप्रकरणी राम रहीमसह ४ जणांना दोषी ठरविण्यात आले आहे. सध्या राम रहीम सध्या रोहतक येथील सुनारिया तुरुंगात बलात्कार प्रकरणी २० वर्षाची शिक्षा भोगत आहे.
नेमके काय आहे प्रकरण
पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्याकांड प्रकरण १६ वर्ष जुने आहे. २००२ मध्ये पत्रकार रामचंद्र छत्रपती यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. छत्रपती सतत त्यांच्या वृत्तपत्रातून डेरा सच्चा सौदा आणि त्यासंबंधीच्या बातम्या प्रसिद्ध करत होते. यामुळे राम रहीम यांनी छत्रपती यांची हत्या केली होती. या प्रकरणाचा तपास नोव्हेंबर २००३ मध्ये सीबीआयकडे सोपवण्यात आला. २००७ मध्ये सीबीआयने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. यात राम रहीम मुख्य आरोपी होता.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.