HW News Marathi
देश / विदेश

न्यायमूर्ती रंजन गोगोई सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश

नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी न्यायमूर्ती रंजन गोगोई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज (बुधवारी ३ ऑक्टोबर)ला गोगोईच्या नियुक्तीची घोषणा केली आहे. न्या. गोगोई हे देशाचे ४६ वे सरन्यायाधीश आहेत. राष्ट्रपती भवनामध्ये गोगोई यांचा शपथ विधी सोहळा पार पडला आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा २ ऑक्टोबरला निवृत्त झाले आहेत. मिश्रा यांनी गोगोई यांना आपले उत्तराधिकारी म्हणून केंद्र सरकारकडे त्यांचे नाव पाठवले होते. यानंतर केंद्र सरकारने गोगोई यांच्या नावावर शिक्कामोर्तबर केले होते.

रंजन गोगोई यांचा अल्प परिचय

न्यायमूर्ती रंजन गोगोई यांचा जन्म १८ नोव्हेंबर १९५४ रोजी आसाममध्ये झाला आहे. २८ फेब्रुवारी २००१ रोजी गुवाहाटी उच्च न्यायालयाचे ते न्यायाधीश बनले होते. यानंतर १२ फेब्रुवारी २०११ रोजी ते पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले होते. २३ एप्रिल २०१२मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमुर्तीपदाची जबाबदारी स्वीकारली होती. ईशान्य भारतातील गोगोई हे पहिले सरन्यायाधीश आहेत. १७ नोव्हेंबर २०१९पर्यंत गोगोई यांची सरन्यायाधीश पदाचा कार्यभार सांभाळणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कुमार मंगलम बिर्ला, सुमन कल्याणपूर यांना पद्म भूषण तर ४ मान्यवर पद्मश्री पुरस्काराने सन्मानित

Aprna

ठाकरे सरकारने लोकशाही मूल्यांची प्रेतयात्रा काढलीय ! आशिष शेलारांची जहरी टीका

News Desk

४५३ कोटी जमा करा, अन्यथा ३ महिने शिक्षा भोगा | सर्वोच्च न्यायालय

News Desk