HW News Marathi
देश / विदेश

भारतीय वंशाच्या कमला हॅरिस या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष, जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल…

वॉशिंग्टन | डेमॉक्रेटिक पक्षाच्या उपराष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी दणदणीत विजय मिळवत इतिहास रचला आहे. भारतीयवंशाच्या कमला हॅरिस यांनी एकाचवेळी अनेक विक्रम केले आहेत. त्या अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्रपती, पहिल्या कृष्णवर्णीय अमेरिकन आणि पहिल्या आशियायी अमेरिकन उपराष्ट्राध्यक्ष ठरल्या आहेत.

अमेरिकेच्या निवडणूक इतिहासात आतापर्यंत एकही महिला उपराष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकू शकलेली नव्हती. मात्र, कमला हॅरिस यांनी विजय मिळवत इतिहास रचला आहे. याआधी अमेरिकेत दोन महिलांना उपराष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी मिळाली होती. २००८ मध्ये रिपब्लिकन पक्षाकडून सारा पॅलिन यांना, तर १९८४ मध्ये डेमोक्रॅटिक पक्षाकडून गिरालडिन फेरारो यांना उपराष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी मिळाली होती. मात्र, दोन्ही वेळा त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. असं असलं तरी अमेरिकेत कृष्णवर्णीय महिलेला उपराष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी देण्याची ही पहिलीच वेळ होती. कमला हॅरिस यांनी यात विजय मिळवत एकाचवेळी अनेक विक्रम केले आहेत.

जाणून घेऊयात कमला हॅरीस यांच्याबद्दल…

कमला‍ हॅरीस यांचा ऑक्टोबर १९६४ साली‍ जन्म झाला.

त्यांचा जन्म कॅलिफोर्नियातल्या ऑकलँडमध्ये झाला. त्यांचे आई-वडील स्थलांतरित होते. त्यांच्या आईचा जन्म भारतातला, तर वडिलांचा जन्म जमैकामधला. हॉर्वर्ड विद्यापीठातून त्यांनी शिक्षण घेतलं. स्वतःच्या ओळखीवर आपण समाधानी असल्याचं आणि स्वतःला केवळ एक अमेरिकन नागरिक म्हणणं आवडत असल्याचं त्या सांगतात.

हॉर्वर्डनंतर कमला हॅरिस यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. त्यानंतर त्या वकिली व्यवसायात उतरल्या. यानंतर त्या अमेरिकेतल्या सर्वात मोठ्या कॅलिफोर्निया राज्याच्या अॅटर्नी जनरलपदी विराजमान झाल्या.कमला हॅरिस दोन वेळा अॅटर्नी जनरल होत्या. त्यानंतर 2017 साली त्या खासदार म्हणून निवडून गेल्या.

कमला हॅरिस अमेरिकेच्या सिनेटमध्ये निवडून जाणाऱ्या पहिल्या भारतीय वंशाच्या महिला आहेत. सध्या त्या सिनेटच्या सदस्य तर आहेच, सोबत डेमॉक्रॅटिक पक्षाकडून त्या उपराष्ट्राध्यक्ष म्हणून निवडूनही आल्या आहेत. त्या 2016 मध्ये पहिल्यांदा डेमॉक्रेटिक पक्षाच्या सिनेट सदस्‍य झाल्या. सिनेटमध्ये त्या कॅलिफोर्नियाचं प्रतिनिधित्‍व करतात. याआधी त्या 2011 ते 2017 पर्यंत स्‍टेट अॅटोर्नी जनरल देखील होत्या.

हॅरिस यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं असून सॅन फ्रान्सिस्को शहराच्या अॅटर्नी म्हणून काम केलेलं आहे. त्यानंतर त्यांनी कॅलिफोर्नियाच्या अॅटर्नी जनरल म्हणून काम केलं. त्या प्रभावी आणि मुद्देसूद बोलतात, चर्चा वा डिबेटदरम्यान डगमगत नाहीत आणि समोरच्याची उलटतपासणी घेतात. सिनेटमधल्या लहान कार्यकाळातही त्यांनी आपली एक राष्ट्रीय प्रतिमा निर्माण केली आहे.

कमला हॅरीस यांचा ऑनलाईन विश्वातला वावरही चांगला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदासाठीच्या शर्यतीत त्यांनी उडी घेतली तेव्हा त्यात त्यांना यश मिळालं नाही, पण त्यांची ऑनलाईन विश्वावरची पकड देशाने पाहिली आहे.

२०१९ साली वॉशिंग्टन पोस्टशी बोलताना त्यांनी म्हटलं होतं की, राजकीय नेत्यांनी वर्ण आणि पार्श्वभूमी या आधारावर कुठल्याही विशिष्ट भूमिकेत शिरता कामा नये. त्या म्हणाल्या होत्या, “मला म्हणायचं आहे की मी जी आहे ती आहे. मला त्याचा आनंद आहे. काय करायचं ते तुम्ही ठरवायचं आहे. पण मी पूर्णपणे आनंदी आहे.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रामदास आठवले यांच्याकडून केरळला मदत

News Desk

हिवाळ्यात पेट्रोल-डिझेलचे दर वाढतात ! | केंद्रीय मंत्र्याचे अजब विधान

News Desk

कोरोनापासून बचाव करण्यासाठी लक्ष्मण रेषा पाळा, पंतप्रधानांचे भारतीयांना आवाहन

swarit