HW News Marathi
देश / विदेश

कपिल शर्मा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

मुंबई | कॉमेडियन कपिल शर्मा पुन्हा एकदा नवीन वादात सापडला आहे. नुकतेच दुबईतील पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल)च्या तिसऱ्या सीझनच्या लॉचिंग सोहळ्यात परफॉर्मन्स केल्यामुळे निर्माण झाला आहे. त्यांनी भारतीय फॉन्स नारजा झाले आहेत. शिवसेना आणि मनसे या दोन्ही राजकीय पक्षांनी त्याला विरोध केला आहे.

मनसे प्रवक्ता अमेय खोपकर यांनीदेखील या प्रकरणी कडक भूमिका घेतली. ‘कपिलला स्वत:ची लाज वाटली पाहीजे. पाकिस्तानी खेळाडूंवर आयपीएलमध्ये बंदी आणली गेली.

तरीही त्याने त्यांच्यासाठी कार्यक्रम केला. मी त्याचा चाहता होतो. पण आता त्याचे कार्यक्रम कधी बघणार नाही. सर्वांनाही मी हेच सांगेन’, असे खोपकर यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

Republic Day | इतिहास भारतीय प्रजासत्ताक दिनाचा

News Desk

सांगलीच्या संभाजी गुरव यांनी एव्हरेस्टवर फडकवला तिरंगा, महाराष्ट्र पोलिसातील पहिले मराठी अधिकारी

News Desk

गुजरातमधील आयपीएस अधिकारी संजीव भट्टला जन्मठेपेची शिक्षा

News Desk
मुंबई

भारत पेट्रोलियमच्या प्लांटमध्ये स्फोट, माहुल गाव हादरले

swarit

मुंबई | चेंबूरच्या माहुलगाव येथील भारत पेट्रोलियमच्या प्लांटमध्ये जोरदार स्फोट होऊन आग लागली आहे. या स्फोटामुळे संपूर्ण चेंबूर हादरलं आहे. या स्फोटाचा आवाज प्रचंड मोठा होता. त्यामुळे सायनपर्यंत त्याचे हादरे जाणवले असून लोकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.

चेंबूर येथे बीपीसीएलमध्ये स्फोट झाला. यामुळे माहूलगाव परिसर हादरला आहे. रिफायनरी प्रकल्पापर्यंत ही आग पोहोचली आहे. या प्रकल्पाच्या जवळच मोनो रेल्वे व पूर्व मुक्त मार्ग आहे.

स्फोटाच्या आवाजाने आजूबाजूचा परिसर अतिशय धोक्याखाली आला होता. अग्निशामक दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून सध्या परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. तसेच आजूबाजूच्या परिसरातील लोकांना लवकरात लवकर तेथून बाहेर जाण्यास सांगितले जात आहे. तसेच सध्या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहे.

घटनास्थळाजवळ असणाऱ्या इतर प्रकल्पांना धोका पोहोचू नये म्हणून महानगरपालिकेचे अधिकारी आणि रिफायनरीच्या अधिकारी शर्थीचे प्रयत्न करत आहे. तसेच २०० ते ३०० कर्मचारी आतमध्ये अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुंबईतील सर्वात दाट परिसर म्हणून यास ओळखले जाते. याठिकाणी अनेक इतरही प्रकल्प आहेत, त्यामुळे आग वेळीच विझवणे शक्य झाले नाही तर इतर प्रकल्पांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच आजूबाजूला अनेक झोपडपट्ट्या असून अशी घटना घडल्यास त्यांच्या जीवाला मोठा धोका आहे. सध्या सहा रुग्णवाहिका देखील घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या स्फोटात ४ ते ५ जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

Related posts

गणेशोत्सव मंडळांना सवलतीत वीज उपलब्ध

Gauri Tilekar

ठाण्यातील कोरम मॉलच्या पार्किंगमध्ये शिरला बिबट्या

News Desk

आता छत्रपती शिवाजी ‘महाराज’ आंतरराष्ट्रीय विमानतळ

News Desk