HW News Marathi
देश / विदेश

अखेर हुकूमशाहीचा विजय झालाच !

नवी दिल्ली | कर्नाटकमध्ये गेल्या बऱ्याच दिवसांपासून कुमारस्वामी सरकारविरोधात सुरु असलेले नाराजी नाट्य आता अखेर संपुष्टात आले आहे. कर्नाटक विधानसभेत मंगळवारी (२३ जुलै) मांडण्यात आलेल्या विश्वासदर्शक ठरावात बहुमत सिद्ध करू न शकल्याने कुमारस्वामी सरकार कोसळले आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आता राजकीय वर्तुळात उलटसुलट मतप्रवाह दिसत आहे. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी देखील याविषयी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “अखेर हुकूमशाहीचा विजय झालाच”, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी यावरून भाजपवर टीका केली आहे.

धनंजय मुंडे यांनी ट्विट करून आपली नाराजी व्यक्त केली आहे. “अखेर हुकूमशाहीचा उदय झालाच ! साम दाम दंड भेद सर्व गोष्टींचा वापर करत भाजपने कर्नाटकातले सरकार पाडलेच. बहुमताच्या जोरावर आता कोणतेही निर्णय घेतले जात आहे. आम्हाला जी भीती होती ती आता सत्यात उतरत आहे”, असे ट्वीट करत धनंजय मुंडे यांनी केले आहे.

कर्नाटक विधानसभेत एकूण उपस्थित २०४ आमदारांपैकी ९९ आमदारांनी कुमारस्वामी यांच्या बाजूने तर १०५ आमदारांनी कुमारस्वामी यांच्या विरोधात मतदान केले आहे. विधानसभा सभापती मत देऊ शकत नाहीत तर १९ आमदार यावेळी अनुपस्थित होते. दरम्यान, यानंतर आता भाजपकडून येडियुराप्पा हे राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा करेल, अशी माहिती मिळते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जाणून घ्या…देशाच्या राजकारणात अल्पावधीतच महत्त्वाचे स्थान मिळविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस बद्दल

News Desk

मोदी सरकार विमाने खरेदी करू शकतात मात्र शेतकऱ्यांसाठी काही करत नाहीत –  प्रियंका गांधी

News Desk

मेणबत्ती फुंकून वाढदिवस साजरा करणे आरोग्याला घातक

News Desk