HW News Marathi
देश / विदेश

कुमारस्वामी सरकारला १८ जुलैला बहुमत सिद्ध करावे लागणार

बंगळुरू | कर्नाटकातील बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. यात मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या जेडीएस-काँग्रेस सरकारला १८ जुलै रोजी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश विधानसभा सभापतींनी दिले आहेत. या बंडखोर आमदारांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यात दोन आमदारांची मन वळविण्यात यश आले आहे.

काही आमदार मात्र राजीनाम्यावर ठाम असून या बंडखोर आमदारांनी काँग्रेस नेत्यांकडून आपल्या जीवाला धोका असल्याचे मुंबई पोलिसांना पत्र लिहून सांगितले आहे. कर्नाटकातील बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर येत्या मंगळवारपर्यंत (१६ जुलै) निर्णय घेऊ नका, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेश कुमार यांनी दिले आहे. या बंडखोर आमदारांनी जेडीएस आणि काँग्रेसच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्ष आमचे राजीनामे मंजूर करण्यास नियमबाह्य पद्धतीने टाळाटाळ करत असल्याच आरोप करत सर्वोच्च न्यायालय याचिका दाखल केली होती.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदी सरकारमधील 4 मंत्र्यांचा मंत्रिमंडळ विस्तारापुर्वी राजीनामा

News Desk

अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्पात रेल्वेसाठी केली ‘ही’ मोठी घोषणा

Aprna

सेल्फी घेणा-या युवकाला हत्तींनी चिरडले

News Desk