HW News Marathi
देश / विदेश

Kathua Rape Case : पीडित मुलीच्या कुटुंबीयांनीच महिला वकिलाला हटवले

दिल्ली | जम्मू-काश्मीरमधील कथुआ येथे ८ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेमुळे संपूर्ण देश हादरून गेला होता. या घटनेनंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी अनेक जण पुढे सरसावले होते. त्यापैकी महिला वकील दीपिका सिंह राजावत यांना पीडित कुटुंबीयांच्यावतीने खटला लढण्यासाठी पुढाकार घेतला होता. परंतु आता पीडित कुटुंबीयांनी या महिला वकिलाला हटवण्याचा निर्णय घेतला आहे.

पीडित मुलीला न्याय मिळावा म्हणून गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत कँडल मॉर्च देखील काढण्यात आल्या होत्या. कथुआ बलात्कारातील पीडित कुटुंबीयांचा खटला लढण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर दीपिका सिंह राजावत यांचे नाव देशभरात पोहोचले होते. त्यांनी पीडितांविषयी दाखवलेल्या कळकळीचे कौतुक झाले होते. मात्र आता राजवत यांना या खटल्यात तेवढासा रस दिसत नाही. तसेच न्यायालयातही उपस्थित राहत नाहीत, असे कारण देत पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी राजावत यांना खटल्यातून हटवण्याची मागणी न्यायालयात केली. त्यानंतर न्यायालयानेही त्यांच्या अर्जाचा विचार करून दीपिका यांना खटल्यातून हटवले. दीपिका यांच्या अशा वागण्याने पीडितेचे कुटुंबीय दु:खी झाले होते. त्यामुळे त्यांना हटवण्याचा निर्णय घेण्यात आला, असे पीडितेच्या कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांनी माहिती संत्रांकडून मिळाली आहे.

जम्मू-काश्मीरच्या कथुआ जिल्ह्यात भटक्या जमातीमधील आठ वर्षाच्या मुलीला मंदिरात कोंडून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. गेल्या १० जानेवारीस या मुलीचे अपहरण केले गेले व एका छोट्या मंदिरात डांबून ठेवून तिच्यावर वारंवार बलात्कार केले गेले. चार दिवस गुंगीच्या औषधांनी बेशुद्ध ठेवल्यानंतर दगडाने डोके ठेचून तिचा खून केला गेला. निश्चित केलेल्या आरोपांत कट कारस्थान करणे, खून, बलात्कार व पुरावे नष्ट करण्यासह अन्य गुन्ह्यांचा समावेश आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#PulwamaAttack : शहीद जवानांना राजनाथ सिंह यांनी खांदा देऊन वाहिली श्रद्धांजली

News Desk

अखेर हार्दिक पटेल यांनी काँग्रेसला दिली सोडचिठ्ठी

Aprna

आसाम निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सोपवली ‘ही’ जबाबदारी

News Desk