HW News Marathi
देश / विदेश

केरळमध्ये एअर इंडियाचं विमान रन वेवरुन काल घसरले, १८ जणांचा मृत्यू तर विमानाचे झाले २ तुकडे 

केरळ | कोरोनामुळे अडकून पडलेल्या भारतीय नागरिकांना वंदे भारत मिशन अंतर्गत परत घेऊन येणारे एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान काल (७ ऑगस्ट) रात्री मुसळधार पावसात केरळमधील कोळीकोड येथील करीपूर विमानतळावर उतरत असताना विमानाचे दोन तुकडे झाले.

या दुर्घटनेत वैमानिकासह १८ जणांचा मृत्यू, तर १२७ प्रवासी जखमी झाले. दरम्यान, या घटनेच्या तपासाचे आदेश केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी दिले. एअरक्राफ्ट एक्सीडेंट इन्वेस्टिगेशन ब्यूरो (AAIB) या घटनेचा तपास करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. प्रवाशांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

“कोझिकोडमध्ये झालेल्या विमान उपघाताचं दु:ख झाले आहे. AXB-1344 हे विमान १९० प्रवाशांसह दुबईवरून कोझीकोड या ठिकाणी येत होतं. पावसामुळे हे विमान धावपट्टीवरून घसरलं आणि विमानाचे तुकडे होण्यापूर्वी ते ३५ फुट खाली गेलं,” अशी माहिती हरदीपसिंह पुरी यांनी दिली.

एअर इंडिया एक्सप्रेसच्या AXB1344, बोईंग 737 विमानाने दुबईहून काल (७ ऑगस्ट) संध्याकाळी ४ वाजून ४५ मिनिटांनी उड्डाण घेतलं होतं. मात्र, संध्याकाळी ७ वाजून ४१ मिनिटांवर रनवेवर लँडिंग दरम्यान हे विमान घसरले होते.

डीजीसीएनुसार, एअर इंडिया एक्सप्रेसचे AXB1344, बोईंग 737 हे विमान दुबईहून कालीकट येथे येत होतं. या विमानात १९० प्रवासी होते. मुसळधार पावसामुळे रनवेवर उतरल्यानंतर विमान घसरले आणि खाडीत पडले. प्रवाशांमध्ये १० लहान मुलांचाही समावेश होता. या भीषण दुर्घटनेत विमानाच्या पुढच्या भागाला जास्त नुकसान झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना कोझिकोड एअरपोर्टवर संध्याकाळी ही घडली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बुलंदशहर हिंसाचारामागच्या मुख्य सूत्रधाराला अटक

News Desk

घरगुती वापरातील गॅस महागला  

News Desk

शंभर वर्षांनतर पूर्ण सूर्यग्रहण पाहण्याची संधी, अमेरिकेने जाहीर केली सुटी

News Desk