HW Marathi
देश / विदेश राजकारण

महाभारतात कृष्ण सारथी होता, कोरोनाच्या युद्धात १३० कोटी महारथी आहेत

नवी दिल्ली | कोरोनाने जगाला वेठीस धरले आहे. २३ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांसाठी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याची घोषणा केली. आज (२५ मार्च) पंतप्रधानांनी वाराणसीतील लोकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. महाभारताचे युद्ध १८ दिवस चालले होते. देशात कोरोनाचे हे युद्ध २१ दिवस सुरु राहील आणि त्यात आपला विजयी होण्याचाच प्रयत्न असेल, अशा शब्दांत मोदींनी विश्वास दर्शवला.

महाभारताच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी सांगितले की, महाभारतातल्या युद्धात बागवान श्री कृष्ण सारथी होते तर कोरोनाच्या या युद्धात १३० कोटी महारथींच्या जोरावर आपण कोरोनाशी लढत आहोत. काशीचा अनुभव शाश्वत, सनातन असल्यानं काशी देशाला संयम, समन्वय आणि संवेदनशीलता शिकवू शकते. सहयोग, शांती, सहनशीलतेची शिकवण काशी देशाला देऊ शकते. साधना, सेवा, समाधानाचा धडा काशीवासी देशाला देऊ शकतात, असे मोदी म्हणाले.

भाषणात पुढे मोदींनी काशीचे महत्त्व सांगितले. काशीचा अर्थच शिव असा होतो. शिव म्हणजे कल्याण. शंकराच्या नगरीत, महादेवाच्या या नगरीमध्ये संकटाशी दोन हात करण्याचा मार्ग दाखवण्याचं सामर्थ्य आहे, अशा शब्दांत मोदींनी काशीचं महात्म्य अधोरेखित केले. तसेच, सर्व वाराणसीच्या नागरिकांनी घरातच बसून राहण्याचे आवाहन मोदींनी केले. आणि लवकच हा कोरोनाचा लढा संपेल असा विश्वासही त्यांनी दाखवला.

Related posts

गोव्यात 5.5 इंच पावसाची नोंद

News Desk

निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांबाबत मवाळ तर विरोधकांबाबत कठोर भूमिका घेते !

News Desk

मी जिथे आहे तिथे खूश आहे !

News Desk