कर्नाटक | कर्नाटकमध्ये गेल्या बर्याचं दिवसांपासुन कुमारस्वामी सरकारविरोधात नाराजी नाट्य सुरू होत. आज अखेर यासंबंधी निकाल आला आहे. विधानसभेमध्ये आज अखेर विश्वासदर्शक ठराव मांडला गेला आणि या ठरावामध्ये कुमारस्वामी यांचे सरकार पडल आहे .विधानसभेत मांडल्या गेलेलल्या विश्वासदर्शक ठरावामध्ये काँग्रेस , जेडीएस आणि भाजपच्या आमदारांचे मतदान घेता आलं आणि यामध्ये कर्नाटक काँग्रेस आणि जेडीएस सरकारला अपयश आलं असून कुमारस्वामी यांचं सरकार पडलं आहे.
BS Yeddyurappa & other Karnataka BJP MLAs show victory sign in the Assembly, after HD Kumaraswamy led Congress-JD(S) coalition government loses trust vote. pic.twitter.com/hmkGHL151z
— ANI (@ANI) July 23, 2019
२२४ विधानसभा सदस्य असलेल्या या सरकारमध्ये कुमारस्वामी सरकारला आपले आमदार जपून ठेवण्यात अपयश आलं आहे. ९९ आमदारांनी कुमारस्वामी यांच्या बाजूने तर १०५ आमदारांनी कुमारस्वामी यांच्या विरोधात मतदान केले आहे . आज या विधानसभेत २०४ उपस्थित आमदारांनी मतदान केले. विधानसभा सभापतींनी आपले मत दिले नाही आणि १९ आमदार आज सभागृहात अनुपस्थित होते. आता यानंतर कुमारस्वामी हे आपला राजीनामा सुपुर्द करतील आणि भाजपाकडून येडियुराप्पा हे राज्यपालांकडे सरकारस्थापनेचा दावा करतील.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.