श्रीनगर | पुलवामा हल्ल्यानंतर सर्वांचे लक्ष जम्मू-काश्मीरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाला आहे. भारत आणि पाकिस्तानच्या सीमा रेषेवर कारवाया सुरूच आहेत. पाकच्या या कारवाईला भारतीय लष्कर सडेतोड उत्तर देत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये भारतीय सैन्य दलाच्या १०० तुकड्या पाठविण्यात येत असून सुमारे १० हजार जवान येथे तैनात करण्यात येणार स्पष्टीकरण जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी दिले आहे. मलिक यांनी आज (२४ फेब्रुवारी) झालेल्या राज्याच्या प्रशासकीय बैठकी वेळी ते बोलत होते.
J&K Raj Bhavan:100 companies of Central Forces being inducted at the moment. More would be inducted in coming weeks. Larger additional police forces are needed for Lok Sabha polls due to possibility of increase in terror activities against candidates&voters on a much larger scale https://t.co/fe1yYOVenP
— ANI (@ANI) February 24, 2019
यावेळी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी सांगितले की, सैन्य ही लोकसभा निवडणुकांसाठीच वाढवली आहे. त्यामुळे लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय महामार्ग बंद असल्याने एलपीजी स्टॉक संपला आहे. त्यामुळे जम्मूहून श्रीनगरला पुरवठा होत नाही. सरकार काश्मीरपर्यंत साहित्य पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे, असेही राज्यपाल म्हणाले. तसेच सीमारेषेपासून जवळ असलेल्या गावांना खाली करण्यासंदर्भात नोटीस जाहीर करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. परंतु गावकरी हे आपले गाव सोडून जाण्यास तयार नसल्याची माहिती मिळाली आहे.
J&K Raj Bhavan: There is no stock of LPG, a result of earlier blockage of National Highway for 7 days & ongoing blockage for the past 4 days, leading to disruption of supplies from Jammu to Srinagar. The government is taking measures to enhance the supplies to the Kashmir region https://t.co/fe1yYOVenP
— ANI (@ANI) February 24, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.