HW News Marathi
देश / विदेश

जाणून घ्या…याआधी कधी भारतीय लष्करावर झाले दहशतवादी हल्ले

नवी दिल्ली | जम्मू-काश्मीर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरून गेला आहे. यावेळी दहशतवाद्यांनी बसमधून जाणाऱ्या सीआरपीएफच्या ताफ्यावर हा हल्ला केला आहे. पुलवामामधील अवंतीपुरातल्या गोरीपोरा भागात सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला.

या दहशतवादी हल्ल्यात ३० जवान शहीद झाले असून, सीआरपीएफचे ४५हून अधिक जवान जखमी झाले आहेत. जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेला हा पहिला नाही. याआधी देखील दहशतवाद्यांनी जवानांना हल्ले केले आहे. दहशतवाद्यांनी याआधी भारतीय लष्करावर किती दहशतवादी हल्ला केला आहे.

भारतीय लष्कराने गेल्या ६ वर्षात ऐवढ्या दहशतवाद्यांना कंठस्नान खातले

भारतील लष्काराने २०१९मध्ये २८ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. तर २०१४ मध्ये ८६६ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. २०१८ मध्ये जवळपास ६१४ दहशतवादी घटना घडल्या आहेत. २०१८ मध्ये भारतीय लष्करातील ९१ जवान शहीद झाले आहेत. तर २०१८ मध्ये २५७ दहशतवाद्यांना कंठस्नान करण्यात आले. तसेच २०१७ मध्ये २१३ दहशतवाद्यांना ठार करण्यात भारतीय लष्करांना यश आले. तर लष्कराने ८० जवानांवर शहीद झाले आहे.

उरीमध्ये सप्टेंबर २०१६ मध्ये दहशतवादी हल्ला

२०१६ मध्ये जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरजवळच्या एलओसीजवळच्या भारतीय लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला होता. या हल्लात १८ भारतीय जवान शहीद झाले आहेत. गेल्या २० वर्षानंतर भारतीय लष्करावर करण्यात आलेला हा सर्वात मोठा हल्ला होता. भारतीय लष्कर या कारवाईत ४ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी रात्रीच्या वेळी हातात शस्त्र नसलेल्या रात्रीच्या वेळी झोपेत असलेल्या जवानांवर हल्ला केला होता. उरीचा बदला घेण्यासाठी भारताने सर्जिकल स्ट्राइकही केले होते.

नगरोटामध्ये नोव्हेंबर २०१६ लष्करी कॅम्पवर हल्ला

२९ नोव्हेंबर २०१६ला जम्मू-काश्मीरमधल्या नगरोटा इथल्या लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात ३ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. तर लष्कराचे ७ जवान शहीद झाले होते. या हल्लात दहशतवादी पोलिसांच्या वेशात आले होते.

एप्रिल २०१७ मध्ये पंजगाममध्ये भारतीय लष्कराच्या कॅम्पवर हल्ला

कुपवाड्यातील पंजगाममध्ये २७ एप्रिल २०१७ मध्ये लष्कराच्या कॅम्पवर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यातील दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले होते. तर तीन भारतीय जवान शहीद झाले होते.

जून २०१७ मध्ये बांदीपोऱ्यातील संबलमधील सीआरपीएफच्या कॅम्पवर हल्ला

५ जून २०१७ ला बांदीपोऱ्यातील संबळमधील सीआरपीएफच्या कॅम्पवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात लष्कराने चार दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.

ऑगस्ट २०१७ मध्ये पुलवामामधील पोलीस लाइनमध्ये हल्ला

२६ ऑगस्ट २०१७ मध्ये पुलमानातील पोलीस लाइन येथे दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्लायत ८ जवान शहीद झाले होते. तर ३ दशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय लष्करांना यश आले होते.

फेब्रुवारी २०१८ मध्ये सुंजवा लष्करी तळावर हल्ला

१० ते ११ फेब्रुवारी २०१८ मध्ये सुंजवा येथील लष्कराच्या तळावर हल्ला झाला होता. यात ३ दहशतवाद्यांना खात्मा करण्यात जवानांना यश आले होते, तर ६ भारतीय लष्करातील ६ जवान शहीद झाले होते.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मेधा कुलकर्णींनी पंतप्रधानांना बांधली राखी! मागितलं ‘हे’ बक्षीस

News Desk

शताब्दी एक्स्प्रेसची बोगी जळून खाक,सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले 

News Desk

“महाविकास आघाडीचा जन्मच….”, कॉंग्रेस-राष्ट्रवादीमधील धुसफुसीवर दावनेंचं वक्तव्य

News Desk