HW News Marathi
देश / विदेश

जेएनयूतील विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत ‘लेफ्ट अलायन्स’चा विजय

नवी दिल्ली | दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील अर्थात जेएनयूमध्ये विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत ‘युनायटेड लेफ्ट अलायन्स’ ने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा पराभव करून संपूर्ण बहुमत मिळवले आहे. विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत या डाव्या संघटनेचा विजय झाला आहे. येथे शनिवारी झालेल्या तोडफोडीच्या पार्श्वभूमीवर आज तणावपूर्ण वातावरणात मतमोजणी पूर्ण करण्यात आली.

‘युनायटेड लेफ्ट अलायन्स’ने विद्यार्थी संघाच्या चारही महत्त्वाच्या पदांवर यशस्वीरीत्या विजय मिळवला आहे. जेएनयूतील विद्यार्थी संघाच्या या निवडणुकीत ‘युनायटेड लेफ्ट अलायन्स’चे एन. साई बालाजी अध्यक्ष म्हणून, तर सारिका चौधरी उपाध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. त्याचप्रमाणे एजाज अहमद सरचिटणीस आणि अमुथा जयदीप सहसचिव म्हणून निवडून आले आहेत.विद्यार्थी संघाच्या या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला दुसऱ्या क्रमांकावर तर, ‘बिरसा फुले आंबेडकर स्टुडेंट असोसिएशन’ला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नेटीझन्सकडून भारतीय वायू सेनेचे अभिनंदन, सोशल मीडियावर ‘Air Strike’ ट्रेंडिंग

News Desk

लोकलमधून फ्रिज नेण्याचा प्रयत्न फसतो तेव्हा.

News Desk

भारतीय लष्कराकडून तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

News Desk