नवी दिल्ली | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात आता चौथा लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन ३१ मेपर्यंत असणार आहे. या चौथ्या लॉकडाऊनमध्ये काय सुरु राहणार आणि काय बंद राहणार याची माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली.
Private offices can open at full strength but they should try that most of the staff works from home. Markets can open but shops will open on odd-even basis. Sports complexes & stadiums can open but without spectators: Delhi Chief Minister Arvind Kejriwal #LockDown4 pic.twitter.com/9N1PAO2We4
— ANI (@ANI) May 18, 2020
दिल्लीत खासगी कार्यालये उघडण्यास केजरीवाल सरकारने संमती दिली आहे. मात्र जास्तीत जास्त कर्मचारी घरुन काम करतील असे पाहा. तसेच बाजारपेठाही उघडण्यास संमती दिली आहे. मात्र, दुकाने उघडण्यासाठी ऑड-इव्हन तारखांचा फॉर्म्युला नक्की करण्यात आला आहे.
तसेच, ऑटो रिक्षा, ई-रिक्षा आणि सायकल रिक्षाची सेवा सुरू केली जात आहे. परंतु, यात फक्त एकाच प्रवाशाला बसविता येईल. दुचाकी वाहन एकट्यालाच चालवावे लागेल. टॅक्सी आणि कॅबमध्ये दोन प्रवाशांना बसता येईल. याशिवाय सरकारी बसेसही सुरू केल्या जात आहेत. मात्र, बसमध्ये फक्त 20 प्रवाशांना प्रवेश दिला जाईल. बसचा प्रवास करताना सोशल डिस्टंसिंगचे पालन महत्वाचे आहे. सॅनिटायजेशनची जबाबदारी ड्रायव्हरवर असेल.
तसेच मार्केटला सुध्दा परवानगी दिली जात आहे. यातील दुकाने ऑड ईवन पद्धतीने सुरू केली जातील. प्रत्येक दुकानात सोशल डिस्टंसिंगचे पालन बंधनकारक आहे. अन्यथा दुकानदारावर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र कंटेनमेंट परिसरात काहीही सुरू करता येणार नाही.
या बाबी बंदचं राहणार –
- सलून आणि स्पा
- मेट्रो, शाळा आणि कॉलेज
- हॉटेल, रेस्टॉरंट, सिनेमा हॉल, मॉल, स्वीमिंग पूल आणि जीम
- राजकीय आणि धार्मिक कार्यक्रम, प्रार्थना सभा
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.