HW Marathi
Covid-19 देश / विदेश

देशातील ‘या’ राज्यात पुन्हा ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवला

कोलकाता | पश्चिम बंगालमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काल (२४ जून) राज्यात लागू असलेला लॉकडाऊन ३१ जुलैपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. पश्चिम बंगालमधील लॉकडाऊनचा कालावधी ३० जूनला संपणार आहे. त्याआधी मुख्यमंत्र्यांनी पुन्हा ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढवला.

‘लॉकडाऊनसदर्भात नेत्यांमध्ये विचारांची भिन्नता दिसून येते. पण, लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात ३० जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला असला तरी काही प्रमाणात शिथीलता देण्यात आली आहे, असे ममता बॅनर्जी राज्य सचिवालयासमोर सभागृहात सर्वपक्षीय बैठकीत म्हणाल्या आहेत.

पश्चिम बंगालमध्ये कोरोनाची बाधा झालेल्या ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा ५९१  वर पोहोचला आहे. याचसोबत राज्यात कोविड-19चे ४४५  नवे रुग्ण समोर आले आहेत. नव्या रुग्णांसोबतच राज्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढून १५१७३  वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी उपचारानंतर ४८४  रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत राज्यात ९७०२ लोक उपचारानंतर कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Related posts

#Coronavirus : दिलासादायक ! काल एकाच दिवशी ७०५ जण कोरोनामुक्त

News Desk

#PulwamaAttack : आम्ही हा हल्ला विसरणार नाही, हल्लेखोरांना माफ करणार नाही !

News Desk

भारतीय सैन्याकडून पाक विरोधात मोठी कारवाई

News Desk