HW News Marathi
देश / विदेश

#Coronavirus : संसदेत वित्त विधेयक मंजुरीनंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळले

नवी दिल्ली | कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव पाहात देशातील महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान या राज्यानी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. सध्या संसदेच्या अर्थसकल्पीय अधिवेशनाचा दुसरा भाग सुरू आहे. वित्त विधेयक मंजूर केल्यानंतर संसदेत आज (२३ मार्च) अर्थसंल्पीय विधेयक गुंडाळले. हे अधिवेशन २ मार्च ते २ एप्रिल असे कामकाज होणार होते. मात्र, देशभरात कोरोनामुळे संसदेचे कामकाज मात्र स्थगित गेले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधीपूर्वीच गुढाळले आहेत.

राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे आणि त्यांचे खासदार पुत्र दुष्यंत सिंह हे बॉलिवूडची गायिका कनिका कपूर हिच्या पार्टीत आढळल्यानंतर याबाबतची चिंता वाढत चालली आहे. दुष्यंत सिंह हे लखनौमध्ये पार्टीत सहभागी झाल्यानंतर पुढचे आठवडाभर संसदेत येत होते. यादरम्यान त्यांनी संसदेच्या कामकाजात, संसदीय समितीच्या बैठकीमध्ये सहभाग घेतला. त्यामुळे त्यांच्या सोबतचे अनेक खासदार कर्मचारीमध्ये भितीचे वातावरण आहे. कनिकाला कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यानंतर वसुंधराराजे यांनी देखील कोरोनाची चाचणी केली. मात्र, त्याचा रिर्पोट यात त्यांना कोरोनाची लाग नसल्याचे सिंद्ध झाले.

मात्र, गायिका कनिका कपूरच्या लखनौतील पार्टीत दुष्यंत सिंह यांनी १७ मार्चच्या पक्षाच्या संसदीय दलाच्या बैठकीला हजर होते. यावेळी त्यांनी अनेक खासदारांची भेट घेतली. १८ मार्च रोजी राष्ट्रपती भवनातील एका कार्यक्रमासही त्यांनी हजेरी लावली. हा सर्व प्रकार पाहात अर्थसंकल्पीय अधिवशेन गुंडाळल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाकिस्तानसारख्या बदमाश देशाला चोरून प्रेमपत्र पाठवायची आवश्यकता काय ?

News Desk

काँग्रेसचे अल्पेश ठाकूर यांचा पैसे उडवितानाचा व्हिडिओ व्हायरल

News Desk

पेगॅसस प्रकरणी नैतिकतेच्या आधारे मोदी सरकारने राजीनामा द्यावा! – नाना पटोले

Aprna