HW News Marathi
देश / विदेश

आज मध्यरात्री दिसणार खंडग्रास चंद्रग्रहण

नवी दिल्ली | भारतासह अनेक देशांना मंगळवारी (१६ जुलै) मध्यरात्री खंडग्रास चंद्रग्रहण पाहण्याची संधी मिळणार आहे. संपूर्ण जगात ज्या ज्या देशांमध्ये मंगळवारी मध्यरात्री चंद्र दिसेल त्या त्या सर्व देशांना हे चंद्रग्रहण पाहता येणार आहे. भारतासह संपूर्ण आशियासह युरोप, आफ्रिका, तर दक्षिण अमेरिका खंडासह रशियाचा काही भाग तसेच ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये देखील हे चंद्रग्रहण दिसणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार, मंगळवारी मध्यरात्री १ वाजून ३१ मिनिटांनी या खंडग्रास चंद्रग्रहणाला सुरुवात होईल.

खंडग्रास चंद्रग्रहणादरम्यान चंद्राचा तब्बल ६५ टक्के भाग हा पृथ्वीच्या सावलीने झाकला जाणार आहे. आज मध्यरात्री आकाश निरभ्र असल्यास संपूर्ण महाराष्ट्राला हे चंद्रग्रहण पाहता येणार आहे. बुधवारी मध्यरात्री १ वाजून ३१ मिनिटांनी या चंद्रग्रहणाला सुरुवात होऊन त्यानंतर २ तासांनी म्हणजेच ३ वाजून १ मिनिटांनी ग्रहण मध्यात असेल तर पहाटे ४ वाजून ३ मिनिटांनी हे ग्रहण संपेल. हे चंद्रग्रहण या वर्षातील दुसरे चंद्रग्रहण असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काश्मीरमधील चकमकीत १ दहशतवाद्याचा खात्मा

News Desk

गुजरातमध्ये तणाव, पोलिसांच्या गोळीबारात एक ठार 

News Desk

निकृष्ट दर्जाच्या जेवणाची तक्रार करणाऱ्या जवानाच्या मुलाचा मृत्यू

News Desk