HW News Marathi
देश / विदेश

एम. के. स्टॅलिन यांची डीएमकेच्या अध्यक्षपदी निवड

चेन्नई | द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके)च्या अध्यक्षपदी एम. के. स्टॅलिन यांची निवड झाली आहे. डीएमकेचे सर्वेसर्वा करुणानिधी यांच्या निधनानंतर पक्षाची दुरा कोणाच्या हाती त्यांची यावरून वाद सरू झाला होता. करुणानिधी यांचे जेष्ठ चिरंजीव एम. के. अलागिरी यांनी आपण त्यांचे खरे वारस असल्याचा दावा केला होता. डीएमकेच्या पक्षाची आज (२८ ऑगस्ट) रोजी चेन्नईत झालेल्या बैठकीत स्टॅलिनच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे.

एम. के स्टॅलिन यांचा अल्प परिचय

एम. के. स्टॅलिन हे दिवंगत करुणानिधी यांचे पुत्र आहेत. सोव्हियत युनियनचे नेते जोसेफ स्टॅलिन यांच्या नावावरून करुणानिधी यांनी त्यांच्या मुलाचे नाव स्टॅलिन ठेवले आहे. स्टॅलिन यांनी वयाच्या १४ व्या वर्षी त्यांच्या वडिलासोबत लहान वयातच प्रचार सरू करून राजकीय प्रवासाला सुरुवात केली. १९७७ मध्ये आणिबाणीमध्ये अंतर्गत सुरक्षा नियमानुसार स्टॅलिन यांना अटक करण्यात आले होते. यानंतर तब्बल १२ वर्षांनी १९८९ रोजी त्यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळाला होता. स्टॅलिन यांना १९९६मध्य चेन्नईचे महापौर करण्यात आले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कृषी कायद्याबाबतच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे शरद पवारांनी केले स्वागत

News Desk

ठरलं! आज संध्याकाळी मोदी सरकारचा विस्तार, ४ मंत्र्यांचे राजीनामे, ४३ नेते मंत्री म्हणून शपथ घेणार!

News Desk

राफेलविरोधातील सर्व याचिका सर्वोच्च न्यायालायने फेटाळल्या

News Desk