HW News Marathi
देश / विदेश

नथुराम गोडसे प्रकरणी कमल हासन यांना अटकपूर्व जामीन मंजूर

चेन्नई | दाक्षिणात्य सुपरस्टार आणि मक्कल निधी मयम पक्षाचे प्रमुख कमल हासन यांना मद्रास हायकोर्टाच्या मदुराई खंडपीठाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. कमल हासन यांनी नथुराम गोडसेंबाबत केलेल्या विधानाविरोधात हिंदू मिनानी पक्षाने हायकोर्टात तक्रार दाखल केली होती.

कमल हासन यांनी चेन्नईतील अरिवाकुरुची विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारसभेत उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले की, नथुराम गोडसे हा महात्मा गांधी यांची हत्या करणारा स्वतंत्र भारतातील पहिला अतिरेकी होता आणि तो हिंदू होता. माझ्यासमोर मुस्लिम असल्याने म्हणत नाही, तर माझ्यासमोर महात्मा गांधी यांच्या पुतळ्याखाली उभा असल्याने मी हे बोलत आहे, असे हसन म्हणाले.

या प्रकरणानंतर पुन्हा प्रचारादरम्यान प्रत्येक धर्मात दहशतवादी आहेत असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. कमल हासन पुढे असे देखील म्हणाले की, आपण प्रामाणिक असल्याचा दावा कुणीही करू शकत नाही. प्रत्येक धर्मात कट्टरपंथी आहेत याबाबतचे इतिहासात दाखले आहेत.” चेन्नईतील त्रिची येथे प्रचारसभेत अंडी आणि दगडफेक झाली होती. त्यावेळी मला असल्या हल्ल्यांची भीती वाटत नाही.

 

Related posts

एमआयएम नेते वारीस पठाण यांच्या तोंडाला काळे फासले

Aprna

सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती एन. व्ही. रमणा यांची नियुक्ती  

News Desk

आज पंतप्रधान मोदींची ‘मन की बात’, भारत-चीन तणावासह कोरोना अनलॉकविषयी बोलणार?

News Desk