नवी दिल्ली | बहुचर्चित अशा टिकटॉक अॅपवर मद्रास न्यायालयाने घालण्यात आलेली बंदी आज (२४ एप्रिल) हटविली आहे. सर्वोच्च न्यायायलायने टिकटॉक अॅपवरील लावलेली बंदी हटविण्याची मागणी करणारी याचिकेवर २४ एप्रिलपर्यंत निर्णय घ्यावा असा आदेश मद्रास न्यायालयाला दिले होते. यावर आज मद्रास न्यायालयात सुनावणीदरम्यान टिकटॉक अॅपवर घातलेली बंदी हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Madurai bench of the Madras High Court lifts ban on TikTok video app. pic.twitter.com/1oFP4oYncs
— ANI (@ANI) April 24, 2019
मद्रास न्यायालयाने आज निर्णय घेतला नाही, तर न्यायालयाने टिकटॉकवर घातलेल्या बंदीचा आदेश रद्दबातल होईल, असे सर्वोच्च न्यायालायाने सांगितले होते. आठवड्या भरापूर्वी सर्वोच्च न्यायलायने मद्रास न्यायालयाने टिकटॉक घातलेल्या बंदीवर स्थगिती देण्यास नकार दिला होता.
मद्रास न्यायालयाने टिकटॉक अॅपवर घातलेल्या बंदीविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मद्रास न्यायालयाने केंद्र सरकारला याबाबत निर्देश देऊन टिकटॉक अॅपवर बंदी आणण्याची सूचना केली होती त्यानंतर केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून गुगल आणि अॅपलला टिकटॉक अॅप प्ले स्टोअरवरुन हटविण्याचे आदेश दिले होते.
टिकटॉक अॅपच्या माध्यमातून समाजात अश्लिलता पसरवली जात आहे असा आरोप करत समाजसेवक आणि ज्येष्ठ वकील मुथु कुमार यांनी मद्रास हायकोर्टात याचिका दाखल केली होती. टिकटॉकच्या माध्यमातून आत्महत्या आणि गुन्हेगारीला प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोप या याचिकेत करत टिकटॉकवर बंदी आणावी अशी मागणी करण्यात आली होती.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.