HW News Marathi
देश / विदेश महाराष्ट्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली योगी आदित्यनाथ यांची भेट

नवी दिल्ली । महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)  यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांची लखनऊ येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली.

मुख्यमंत्री शिंदे दोन दिवसीय उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असून रविवारी रात्री त्यांनी योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. या भेटीच्या वेळी योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर मुख्यमंत्री शिंदे यांनी योगी आदित्यनाथ यांना शाल, पुष्पगुच्छ तसेच ‘श्री गणेशाची’ मूर्ती भेट दिली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दोन दिवसीय दौऱ्याचे अनुभव सांगितले. तसेच, अयोध्येत होत असलेल्या विकासकामांचे कौतुक केले.
यावेळी योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या सन्मानार्थ रात्री भोजन आयोजित केले. याप्रसंगी राज्याचे मंत्री तसेच आमदार, खासदार उपस्थित होते.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई

News Desk

भाजप म्हणते, देगलूरमध्ये पंढरपूरची पुनरावृत्ती होणार! पण लॉटरी एकदाच लागते, अशोक चव्हाणांचा हल्लाबोल!

News Desk

शक्य तितक्या लवकर इम्पिरिकल डाटा देण्याची छगन भुजबळांनी केली मागणी

Aprna