HW News Marathi
Covid-19

“लोक तडफडून मरत असतानाही मोदींना पाझर का फुटत नाही ?”

मुंबई । महाराष्ट्र काँग्रेसकडून पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला करण्यात आला आहे. “कोरोना संकट दिवसेंदिवस आक्राळविक्राळ रुप धारण करत असताना पंतप्रधान मोदींचा असंवेदनशीलपणाही तेवढाच वाढत आहे. पहिले रेमडेसीवीरचा घोळ घातला त्यानंतर लसींच्या घोळाने केंद्र सरकारचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. देशातील अनेक उच्च न्यायालये तसेच सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले. औषधांअभावी लोक तडफडून मरत आहेत तरीही मोदींना पाझर फुटत नाही”, असे म्हणत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

केंद्र सरकारला फटकारताना नागपूर खंडपीठानेही अम्फोटेरीसीन-बी औषधाच्या तुडवड्यावरून केंद्र सरकारला खडे बोल सुनावले. म्युकरमायकोसीसच्या आजाराने नागपुरमध्ये लोक मरत आहेत, राज्यावर जबाबदारी ढकलू नका, औषध उपलब्ध का करुन द्या असे नागपूर खंडपीठाने म्हटल्याचे देखील अतुल लोंढे यांनी नमूद केले आहे.

मोदी सरकारकडे कोरोनास्थिती हाताळण्यासाठी कोणतेही धोरण नाही !

पूढे अतुल लोंढे म्हणाले की, “कोरोनाबरोबरच म्युकरमायकोसीस रोगाने लोक त्रस्त आहेत. रुग्णांची संख्या वाढत आहे परंतु या आजारावर उपयोगी असलेल्या अम्फोटेरीसीन-बी औषधांचा पुरेसा पुरवठा होत नाही. यावरून नागपूर खंडपीठाने मोदी सरकारला सुनावले पण मोदी सरकारवर त्याचा काही परिणाम होताना दिसत नाही. मोदी सरकारकडे कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी कोणतेही धोरण नाही. कोर्टात फक्त तोंडी माहिती देता आणि परत हे कोर्टाचे काम नाही असे कोर्टालाच सांगता हे अत्यंत बेजबाबदार व बेफिकीरपणाचे लक्षण आहे.”

मोदी नागपूरवर कोणता सूड उगवत आहे ? असा लोकांचा सवाल

अतुल लोंढे पुढे नागपूरबाबत बोलताना म्हणाले की, नागपूर शहर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे, नागपूर महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे, किमान त्याचे भान ठेवून तरी नागपूरच्या जनतेला कोरोना संकटकाळात योग्य त्या सुविधा पुरवण्याकडे लक्ष देतील अशी नागपुरकरांची अपेक्षा होती पण परिस्थिती अत्यंत वाईट आहे. मोदी नागपूरवर कोणता सूड उगवत आहेत, असा सवाल जनता विचारू लागली आहे. औषधे पुरवण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे या जबाबदारीतून पळ काढू नका. अम्फोटेरीसीन-बी औषध नागपूरला उपलब्ध करुन द्या”, अशी मागणी लोंढे यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे

News Desk

ठाकरे सरकारकडून मराठा समाजाचा ‘कोल्ड ब्लडेड खून’ ! शेलारांचा घणाघाती आरोप

News Desk

गाव अवघ्या १४ किलोमीटरवर होते आणि…

News Desk