नवी दिल्ली | कर्नाटकातील राजकीय भूकंपाचे पडसात आता मुंबईत उमटले आहेत. सत्ताधारी काँग्रेस आणि जेडीएस आघाडी पक्षातील राजीमाना दिलेले आमदार मुंबईतील सोफीटेल हॉटेलमध्ये थांबले असून या हॉटेलबाहेर आज (७ जुलै) काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. या प्रकरणी पोलिसांनी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. मुंबईच्या काँग्रेसचे ७ तर जेडीएसचे ३ असे एकूण १० आमदार हॉटेलमध्ये थांबले आहेत.
Maharashtra Youth Congress workers including its vice-president
Suraj Singh Thakur have been detained by police during their protest outside Sofitel hotel asking #Karnataka Congress MLAs to take back their resignation. pic.twitter.com/qLuXQVSqBF— ANI (@ANI) July 7, 2019
कर्नाटकमधील काँग्रेस आणि जेडीएसच्या १३ आमदारांनी शनिवारी (६ जुलै) आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला होता. त्यानंतर हे आमदार बंगळुरूवरून थेट मुंबईत दाखल झाले. हे सर्वजण सोफीटेल हॉटेलमध्ये सदर आमदार सध्या राहत आहेत. या आमदारांनी केलेल्या बंडखोरीविरोधात मुंबईतील काँग्रेस कार्यकर्त्यांनी संतप्त व्यक्त केला आहे. तसेच या आमदारांविरोधात मुंबईतील काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. या प्रकरणी सुरज सिंह ठाकूर यांच्यासह काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.