HW Marathi
देश / विदेश राजकारण

ममता बॅनर्जींच्या अधिकाऱ्याचा मुलगा ‘कोरोना’बाधित

पश्चिम बंगाल | जगभरात सध्या ‘कोरोना’ व्हायरसने मोठा धुमाकूळ घातला आहे. चीनच्या वुहान शहरात सर्वप्रथम वाढलेल्या या व्हायरसचा प्रादुर्भाव आता जगभरातील अनेक देशांमध्ये वाढू लागला आहे. भारतातही कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. देशातील कोरोना बाधितांचा आकडा १७० तर महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा ४९ वर पोहोचला आहे. कोरोनाबाधितांचा हा आकडा सातत्याने वाढत असल्याने आता नागरिकांमध्ये मोठे घबराटीचे वातावरण आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या गृहविभागाच्या अधिकाऱ्याच्या मुलाला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

पश्चिम बंगालच्या ब्रिटनवरून आलेल्या त्या अधिकाऱ्याच्या १८ वर्षांचा मुलाला कोरोना व्हायरसची लागण झाली असली तरीही त्याने कोरोना चाचणीला नकार दिला होता. इतकेच नव्हे तर त्या मुलाने त्यानंतरचे तीन दिवस अनेकांच्या भेटीगाठी घेतल्याचीही माहिती समोर आली आहे. या सर्व प्रकारामुळे ममता बॅनर्जी प्रचंड नाराज झाल्या होत्या. “इथे कोणीही व्हीआयपी किंवा एलआयपी नाही. सर्वजण सामान आहेत. सर्वांनीच नियम पाळायचे आहेत”, अशा स्पष्ट सूचना ममता बॅनर्जी यांच्याकडून देण्यात आल्या आहेत. ममता बॅनर्जी यांनी या प्रकरणी आपल्या अधिकाऱ्याला चांगलेच सुनावले आहे. “इतकी व्यवस्था असूनही एखादी व्यक्ती तुमच्या हातून कशी सुटते ? हा बेजबाबदारपणा आहे”, असेही ममता बॅनर्जींनी यावेळी प्रशासनाला सुनावले.

Related posts

उत्तम प्रकृतीसाठी सदिच्छा, प्रार्थना करणाऱ्या सर्वांसह राज्यातील जनतेचे उपमुख्यमंत्र्यांनी मानले जाहीर आभार

News Desk

रेल्वे मंत्रालयाने विशेष ट्रेनच्या तिकीट बुकिंगद्वारे केली ऐवढी कमाई

News Desk

राज्याचे मुख्यमंत्री चांगले आहेत, पण… !

News Desk