HW News Marathi
देश / विदेश

ममता बॅनर्जींनी दिल्लीत घेतली नितीन गडकरींची भेट

नवी दिल्ली | दिल्लीत सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने अनेक नेत्यांच्या अपेक्षित आणि अनपेक्षित भेटी होताना दिसत आहेत. अशीच एक भेट आज (२९ जुलै) झाली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत त्यांच्या घरी भेट घेतली आहे. भेटीचं कारण समजलं नाही मात्र ही भेट महत्वाची नक्कीच मानली जात आहे.

ममता बॅनर्जींनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची निवासस्थानी घेतली भेट…!

दिल्ली दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जेव्हा काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींना भेटल्या, त्यावेळी राहुल गांधीदेखील उपस्थित होते. या भेटीनंतर ममतांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते आनंद शर्मांसह विविध विरोधी पक्षनेत्यांच्या गाठीभेठी घेतल्या. त्यामुळे ममता बॅनर्जी आता 2024 च्या तयारीला लागल्याची चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात रंगली होती.

काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?

देशातील सर्व विरोधकांची एकजूट व्हावी, हेच सोनिया गांधींचं मत असल्याचं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं. काँग्रेसचा सर्वसमावेशकतेवर विश्वास असून देशातील छोट्या पक्षांचाही काँग्रेसवरच अधिक विश्वास असल्याचं त्या म्हणाल्या. सध्या देशावर आलेलं कोरोनाचं संकट आणि पेगॅसिस पाळत प्रकरणावरही आपण सोनिया गांधींशी चर्चा केल्याचं त्यांनी सांगितलं. भाजपला टक्कर द्यायची असेल, तर देशपातळीवर सर्व विरोधकांनी एकत्र यायची गरज असल्याचं त्या म्हणाल्या होत्या.

मोठ्या टोकाच्या भूमिकेनंतर ममता बॅनर्जींनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट,म्हणाल्या….!

श्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. पंतप्रधान निवासमध्ये ममता बॅनर्जी यांनी मोदींसोबत चर्चा केली आहे. ममता बॅनर्जी पाच दिवसीय दिल्ली दौऱ्यावर असून सोमावारी दिल्लीत दाखल झाल्या आहेत. मंगळवार सकाळपासूनच ममता बॅनर्जी यांच्या राजकीय मंडळींसोबत भेटीगाठींचं सत्र सुरु आहे. निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर, काँग्रेस नेते कमलनाथ यांची भेट आणि चर्चा झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती.मोदी यांच्याशी दुसऱ्यांदा भेटपश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणूकीच्या विजयानंतर ममता बॅनर्जी प्रथमच दिल्लीत दाखल झाल्या आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दुसऱ्यांदा भेटत आहेत. पश्चिम बंगालमध्ये आलेल्या चक्रीवादळानंतर ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली होती. मंगळवारी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी भेटीबाबत माहिती दिली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माजी ॲटर्नी जनरल सोली सोराबजींचे कोरोनामुळे निधन

News Desk

आजपासून फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांसह ज्येष्ठ नागरिकांना मिळणार ‘बुस्टर डोस’

News Desk

थरुर प्रेयसींना कसे भेटणार | सुब्रमण्यम स्वामी

News Desk