पश्चिम बंगाल | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी सध्या दिल्लीत आहेत. ममता बॅनर्जी राष्ट्रीय राजकारणाचं केंद्र असलेल्या दिल्लीनं सगळ्यांचीच त्यांच्यावर नजर आहे. ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र यांची भेट घेतलीच. पण, त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. त्याचबरोबर इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांच्याही त्या भेटीगाठी घेत आहेत. ममता यांच्या दिल्ली दौऱ्यापूर्वी त्यांचे राजकीय सल्लागार प्रशांत किशोर यांनी नेत्यांच्या भेटी घेतल्या. त्यामुळे आक्रमक भाजपाविरोधात आक्रमक असलेल्या ममता यांच्याकडे विरोधकांच्या आघाडीचं नेतृत्व जाऊ शकतं अशी चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेवर आता ममता बॅनर्जी यांनीच भूमिका मांडली आहे.
I am not a political astrologer, depends on situation; have no problem if someone else leads: Mamata Banerjee on being the face of Opposition
— Press Trust of India (@PTI_News) July 28, 2021
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या दिल्लीत असून, काल (२७ जुलै) त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाविरोधात विरोधकांची आघाडी निर्माण होतं असल्याचं चित्र आहे. त्यासाठी प्रशांत किशोर यांच्याकडूनही प्रयत्न केले जात असल्याचं दिसत आहे. मात्र, या आघाडीचं नेतृत्व कोण करणार हे स्पष्ट झालेलं नाही. याबद्दल माध्यमांनी ममतांना प्रश्न विचारला. आघाडीचं नेतृत्व आपण करणार आहात का? त्यावर ममता म्हणाल्या,” मी राजकीय भविष्यवाणी करणारी व्यक्ती नाही. हे सर्व ज्या त्या वेळच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. सिस्टीम आणि पद्धतीवर अवलंबून असेल. राजकीय पक्ष एकत्रितपणे कसं काम करतात, त्यावर अवलंबून आहे. त्यातून नेतृत्व पुढे येईल. कुणीही नेतृत्व केलं तरी मला अडचण नाही. आम्ही त्याला पाठिंबा देऊ”, असं ममता म्हणाल्या आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.