कोलकाता | देशात कोरोनाच्या महामारीने हाहाकार घातला आहे. या कोरानाच्या संकटाला कसा आळा घालायचा यासाठी केंद्र आणि राज्य सरकार काम करत आहे. देशात लॉकडाऊन असूनही काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे. त्यामूळे त्यावर निर्बंध घालण्यासाठी काही राज्यांमध्ये आयएमसीटी पाठवण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. ही टीम राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि नियमांचे उल्लंघन झाल्यास त्याचा आढावा केंद्राला देणार आहे. मात्र, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी याचा निषेध केला आहे. कोरोना साथीच्या विरोधात केंद्र सरकारचा पाठिंबा आणि सूचनांचे आम्ही स्वागत करतो. पण पश्चिम बंगालसह इतर काही राज्यांमध्ये आयएमसीटी पाठविण्याचा केंद्र सरकारचा निर्णय समजण्यापलीकडचा आहे, असे ममता बॅनर्जी यांनी ट्विट केले आहे.
I urge both Honb’le Prime Minister @NarendraModi Ji & Home Minister @AmitShah Ji to share the criterion used for this. Until then I am afraid, we would not be able to move ahead on this as without valid reasons this might not be consistent with the spirit of federalism. (2/2)
— Mamata Banerjee (@MamataOfficial) April 20, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.