मुंबई | भाजपला मणिपूरमध्ये मोठा धक्का बसला आहे. मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपच्या तीन आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश असून सहा आमदारांनी भाजपला दिलेला पाठिंबा काढून घेतला आहे. तसेच राष्ट्रीय जन पक्षाचे चार, तृणमूल काँग्रेस एक आणि एका अपक्षाने पाठिंबा काढला असून या सर्वांनी आता काँग्रेसला पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणुकांच्या तोंडावर मोठा धक्का मानला जात आहे.
Manipur: S Subhashchandra Singh, TT Haokip & Samuel Jendai resign as BJP MLAs&join Congress. NPP's Y Joykumar Singh, N. Kayisii, L Jayanta Kumar Singh & Letpao Haokip, resign from ministerial posts. TMC's T Robindro Singh&Independent MLA Shahabuddin withdraw their support to BJP.
— ANI (@ANI) June 17, 2020
सुभाषचंद्र सिंह, टीटी होईकीप आणि सॅम्युअल जेंदेई या तीन भाजप आमदारांनी राजीनामा दिला असल्याची माहिती मिळली आहे. मणिपूरमध्ये ९ आमदारांनी साथ सोडल्यानंतर बिरेन सिंह सरकारला मोठा फटका बसणार आहे. तसेच आता माजी मुख्यमंत्री ओक्रम इबोदी सिंग हे मणिपूरचे आगामी मुख्यमंत्री असतील, असा दावा काँग्रेसने केला आहे. ओक्रम इबोदी सिंग हे तीन वेळा मणिपूरचे मुख्यमंत्री राहिले आहेत.
मणिपूरमध्ये २०१७ मध्ये विधानसभा निवडणूक झाल्या आहेत. तर ६० सदस्यी असलेल्या विधानसभेमध्ये २८ जागांवर विजय मिळवित काँग्रेस मोठा पक्ष ठरले होते. मात्र, भाजपला २१ जागा मिळाल्या होत्या. पण, भाजपने चार एनपीपी, चार एनपीएफ, एक लोजप, एक तृणमूल, एक अपक्ष आणि एक कॉंग्रेस बंडखोर अशा १२ जणांचा पाठिंबा मिळवून बहुमत मिळवित सरकार स्थापन केले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.