उत्तराखंड | उत्तराखंडच्या जोशीमठ तालुक्यात अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. जोशीमठात मोठा हिमकडा कोसळल्याने धौली गंगा नदीला महापूर आला आहे. त्यामुळे पाण्याच्या प्रचंड प्रवाहाबरोबर अनेकजण वाहून गेल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे जोशीमठ तालुक्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज सकाळी ही दुर्घटना घडली. जोशीमठ तालुक्यातील रैणी गावात हिमकडा कोसळला. त्यामुळे या धौली गंगा नदीला महापूर आला आहे. त्यातच या धरणाचा कडाही तुटल्याने या ठिकाणी पाणीच पाणी झाले असून अनेक घरे आणि माणसे वाहून गेले आहेत. निसर्गाच्या या प्रकोपामुळे उत्तराखंडमध्ये एकच हाहाकार माजला असून या ठिकाणी अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.
#WATCH | Water level in Dhauliganga river rises suddenly following avalanche near a power project at Raini village in Tapovan area of Chamoli district. #Uttarakhand pic.twitter.com/syiokujhns
— ANI (@ANI) February 7, 2021
मुख्यमंत्र्यांकडून हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आला आहे. 1070 आणि 9557444486. मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी या घटनेमध्ये अडकलेल्या लोकांसाठी हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत.“जर तुम्ही एखाद्या प्रभावित क्षेत्रामध्ये फकला असाल, आणि तुम्हाला कुठल्याही मदतीची गरज असेल तर कृपया या नंबरवर 1070 किंवा 9557444486 नंबरवर संपर्क करा. कृपया घटनेचा व्हीडिओ व्हायरल करू नका. असं रावत यांनी म्हटलं आहे.
अलकानंदजवळील भागातून लोकांना बाहेर काढण्यात येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून भागीरथी नदीचा प्रवाह थांबवण्यात आला आहे. अलकनंदाच्या पाण्याचा प्रवाह रोखण्यासाठी श्रीनगर धरण आणि ऋषिकेश धरण रिकामं करण्यात येईल. घटनास्थळी एसडीआरएफ सतर्क असून मी घटनास्थळी जात असल्याची माहिती मुख्यमंत्री यांनी दिली आहे.
मोठा हिमकडा कोसळून नदीला महापूर आल्याने पुराचे पाणी घराघरात शिरले आहे. त्यामुळे धरणाजवळची अनेक गावं या पुरात वाहून गेली आहेत. तसेच माणसे, गुरेढोरेही वाहून उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळला आहे., महापुरामुळे अनेक लोक वाहून गेले, अॅलर्ट जारी; पाहा शेतीचंही मोठं नुकसान झाल्याचं वृत्त आहे. या ठिकाणी प्रशासानाचे कर्मचारी आणि रेस्क्यु ऑपरेशन टीम पोहोचली असून युद्धपातळीवर रेस्क्यु ऑपरेशन सुरू आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.