नवी दिल्ली | मसाल्याचे बादशहा म्हणून ख्याती असलेले एमडीएच मसाले कंपनीचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांच्या निधनाबाबतची अफवा होती. महाशय धर्मपाल गुलाटी यांच्या परिवाराकडून एका व्हिडीओमध्ये यांची प्रकृती उत्तम असल्याचे सांगितले आहे. शनिवारी (६ ऑक्टोबर) रात्रीपासून सोशल मीडियावर महाशय धर्मपाल गुलाटी यांच्या निधनाची अफवा परसरली होती. परंतु ही केवळ अफवा असल्याचे महाशय धर्मपाल गुलाटी यांच्या परिवाराकडून सांगण्यात आले. गुलाटी यांचा व्हिडीओ आल्यानंतर त्यांच्या निधनाच्या अफवांना पूर्णविराम देण्यात आला आहे.
#MDH मसाले के सरताज की सलामती का वीडियो
Via @SeemaKumarGill pic.twitter.com/h40BPEyR7G
— Umashankar Singh उमाशंकर सिंह (@umashankarsingh) October 7, 2018
चुन्नी लाला त्यांचे संपूर्ण नाव महाशय धर्मपाल गुलाटी हे चुन्नी लाल गुलाटी हे ९९ वर्षाचे आहेत. एमडीएच(महाशिया डी हट्टी) कंपनी मसाल्याच्या पदार्थाचे उत्पादन करणाऱ्या कंपनीचे ते मालक आहेत. मसाल्यांच्या कंपनीमध्ये एमडीएच कंपनी देशात वेगळी ओळख स्थान आहे. जगातील १०० देशांमध्ये एमदिएचच्या कंपनीचा कारभार चालतो. दिल्लीतील करोल बागमध्ये ते राहायचे. त्या नांतर भारतात त्यांनी मसाल्याचे पदार्थ बनवण्याचे कंपनी सुरु केली.
चुन्नी लाला गुलाटी यांचा अल्प परिचय
एमडीएचचे मालक चुन्नी लाल गुलाटी यांचा जन्म १९१९मध्ये झाला.त्यांचे शालेय शिक्षण इयत्ता पाचवी पर्यंत झालेत त्यांनतर ते त्यांच्या वडिलांसोबत दुकान सांभाळायला सुरुवात केली. सिलकोटमध्ये त्यांनी मसाल्याचं छोटस दुकान होत. फाळणीनंतर चुन्नी लाल दिल्लीमध्ये राहायला आले. करोलबागमध्ये त्यांनी मसाल्याची छोटीशी फॅक्टरी सुरू केली आणि त्या नंतर हळूहळू एमडीएच ही १५०० करोड रुपयांची कंपनी उभी केली. १०० पेक्षा जास्त देशानंमध्ये एमडीएचच्या मालाची सप्लाय होते. लंडन व दुबईमध्ये एमडीएचची कंपनी आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.